बीसीसीआयच्या अध्यक्षपदी शिस्तप्रिय शशांक मनोहर यांची बिनविरोध निवड

मुंबई: जगमोहन दालमिया यांच्या आकस्मित मृत्त्यूनंतर भारतीय क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वानखेडे स्टेडीयम येथे झालेल्या बीसीसीआयच्या विशेष सभेत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. काल झालेल्या बीसीसीआयच्या मुख्यालयात बोर्डाचे सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. या विशेष सभेत सर्वांच्या पसंदीने शशांक मनोहर यांची अध्यक्षपदी वर्णी करण्यात आली. अध्यक्षपदासाठी शनिवारी मनोहर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. तेव्हाच त्यांची निवड निश्चित समजण्यात आली होती. सध्या बीसीसीआयचे अध्यक्षपद हे पूर्व विभागाकडे आहे. त्यानुसार दिवंगत अध्यक्ष जगमोहन दालमिया हे कारभार सांभाळत होते. त्यांच्या मृत्त्यूनंतर नवीन अध्यक्षपदासाठी केवळ एकच अर्ज दाखल झाला. पुर्व विभागातल्या सहाही संघटनांचा पाठिंबा मिळाला होता. शशांक मनोहर हे व्यवसायाने वकील असून सध्या ते विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. २००८ ते २०११ या कालावधीत मनोहर यांनी बीसीसीआयचं अध्यक्षपद सांभाळलं होतं.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *