दुर्गरक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित किल्ले साल्हेर (बागलाण) गडस्वच्छता मोहिम

गडाचा इतिहास… शिवरायांनी सुरत लुटी दरम्यान याच किल्ल्यांवर विश्राम व वास्तव्य केलंय. त्याबरोबरच राज्याभिषेकाला खर्ची पडलेल्या रकमेला जपण्यासाठी मुल्हेर किल्ला महत्वाचा ठरलाय. बागुल राठोड हिंदुराज्याची राजधानी मुल्हेर, ज्यावरून या प्रदेशास ‘बागलाण’ नाव मिळाले. ऐतिहासिक व पौराणिक वारसा असलेला मुल्हेर किल्ला तसेच, मराठ्यांची मुघलांसोबतची इतिहासातिल अजरामर पहिली वा सर्वात मोठी ऐतिहासिक तुंबळ लढाई याच साल्हेर किल्ल्याच्या परिसरात समोरा-समोर येऊन अगदी महाभारतासमान याच ठिकाणी झाली ! महाराजांचे शूर सरदार मोरोपंत पिंगळे, सरनौबत प्रतापराव गुर्जर यांनी मोठा पराक्रम गाजवून प्रचंड मोठा विजय मिळवला. पण महाराजांचे बालपणीचे मित्र पंचहजारी सरदार वीर सूर्यराव काकडे या युध्दात पराक्रम गाजवत असताना तोफेचा गोळा लागुन धारातीर्थी पडले! जवळपास १०हजार मुघल कापून काढलेली पवित्र भूमी ! शिवछत्रपतींना हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आत्मविश्वास देणारी हिच ती भुमी !!! गडावर कसे पोहोचाल नाशिक येथून मुंबई-आग्रा महामार्गावर अंदाजे ५० किमी वर सोग्रस फाटा फुटतो तेथून सटाणा-साक्री राज्य मार्गावर वळावे. पुढे ताहाराबाद अंदाजे ७०किमी. या गावापासून वळण घेवून ९किमी मुल्हेर लागते. तेथून अंदाजे १६ किमी वर साल्हेर किल्ला आहे. त्याच्या पायथ्याशी पोहोचावे… दोन्ही गडावर पाण्याची वा रहाण्याची सोय आहे. खाण्याची सोय आपण स्वतः करावी. गडावर सूर्यराव काकडेंची समाधी आहे. अगदी टोकावर भगवान परशुरामाचे मंदीर आहे. तिथूनच त्यांनी बाण मारून समुद्र गुजराथ सूरत पर्यंत हटवल्याचे स्थान आहे. त्यांचे पदचिन्ह आजही आहेत! सोबत काय घ्याल? हलके (गड चढायला सोपे जावे म्हणून) वा उबदार कपडे, चांगली ग्रिप असलेले शुज खोदकाम वा जीर्ण वास्तुंजवळील माती काढण्यासाठी कुदळ, फावडे, पाटी तसेच कुऱ्हाड वा विळा. प्लास्टिकचा मोठ्या पिशव्या गडावरिल कचरा उचलण्यासाठी! आपणास कुठलेही औषधी सुरु असल्यास ते व प्रथमोपचार सोबत ठेवावी. गड चढताना थकवा ग्लानी आल्यास पाणी व शक्तिवर्धक ओ.आर. एस. पाकिटे सोबत असल्यास उत्तम. सुका खाऊ इत्यादी सोबत ठेवावे. मोहिम खर्च २०० रुपये प्रत्येकी. जाणे येणे वगळून ! टिप:- कामाचा वेळी कुणीही सेल्फी काढत बसू नये. त्यासाठी ठराविक वेळ असेल. अधिक माहितीसाठी संपर्क:- श्री तुषार (रेक्स) धात्रक नाशिक ९५५२९३११४३ ८७९३९३२१११ श्री उदय उपासनी, नाशिक ९४०३५७३५४६, ९८५०४१८२२३ श्री ज्ञानेश(नाना) रसाळ नाशिक ७२७६००६०६५ श्री कुलदिपजी जाधव, मुंबई व ठाणे विभाग ९८३३२६९९७४ श्री आनंदराव(अण्णा) जाधव पुणे, सातारा व उर्वरित महाराष्ट्र विभाग ९७६७९८२२३३ दुर्गरक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ( श्री. उदयजी उपासनी, नाशिक )]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *