रणजी ट्रॉफी २०१८-१९: मुंबई-रेल्वे सामना अनिर्णित

दिल्ली: भारतीय घरेलू क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्टेच्या मानल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात रेल्वेने ४१ वेळेच्या विजेत्या मुंबईविरुद्ध सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबईने तीन गुणांची कमाई करीत चांगली सुरुवात केली आहे तर रेल्वेला एका गुणावर समाधान मानावं लागलं. मुंबईने यापूर्वी २०१५-१६ सालाची रणजी ट्रॉफी स्पर्धा जिंकी होती. त्यानंतर मुंबईला या मानाच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरता आलेले नाही. २०१६-१७ साली गुजरात विरुद्ध अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत धवल कुलकर्णीने संघाची धुरा सांभाळत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. युवा खेळाडूंसह उतरलेल्या मुंबईच्या डावाची सुरुवात काहीशी अडखळत झाली होती. पण मधल्या फळीतील फलंदाजांनी डाव सांभाळत मुंबईला पहिल्या डावात समाधानकारक ४११ धावा धावफलकावर लावल्या. शिवम दुबे (११४), सिद्धेश लाड (९९) सूर्यकुमार यादव (८३) यांनी मुंबईला सांभाळले. मुंबईच्या ४११ धावांना प्रतिउत्तर देण्यास उतरलेल्या रेल्वे संघाची सुरुवात गडबडली. तुषार देशपांडेच्या भेदक माऱ्यासमोर रेल्वेचे फलंदाज अक्षरशः रडले. तुषारने २४.२ षटकांची गोलंदाजी करताना ७ षटके ७० धावांत रेल्वेच्या सहा फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. प्रथम-श्रेणी क्रिकेमधील त्याची हि सर्वोत्तम कामगिरी ठरली. रेल्वेकडून अरिंदम घोषने सर्वाधिक ७१ धावांचं योगदान दिलं. तळाच्या फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी केलेली चिवट फलंदाजी रेल्वेच्या कमी पहिल्या डावातील आघाडीनंतर दुसऱ्या डावताही मुंबईने सुरेख फलंदाजीचा नमुना पेश केला. जय बिस्त व अखिल हेरवाडकर हे सलामी फलंदाज स्वस्तात परतल्यानंतर पुन्हा एकदा सिद्धेश लाड मुंबईच्या मदतीला धावून आला. तर माजी कर्णधार आदित्य तारेने संयमी फलंदाजी करीत प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये आपले आठवे शतक झळकावले. पहिल्या डावातील शतकवीर शिवम दुबेने दुसऱ्या डावही जबरदस्त फलंदाजी करीत केवळ ९९ चेंडूंत ६९ धावा लगावल्या. सिद्धेशने पहिल्या डावातील चांगली फलंदाजी दुसऱ्या डावातही चालू ठेवत १६८ चेंडूंत ७६ धावा केल्या. रेल्वेकडून हर्ष त्यागीने दुसऱ्या डावात मुंबईच्या पाचपैकी तीन फलंदाजांना तंबूत धाडले. यात सूर्यकुमार यादव व सिद्धेश लाड यांचाही समावेश होता. तुषार देशपांडेला सामनावीराचा किताब बहाल करण्यात आला.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *