सदर उपक्रमास, पर्यावरण मित्र संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, संस्थापक श्री देवा तांबे सर, संस्थेचे पुणे जिल्हा अध्यक्ष श्री जनार्दन सर , महिला उपाध्यक्षा सौ.वंदना पोतदार , हवेली तालुका अध्यक्ष श्री.चंद्रकांत कांबळे सर , हवेली तालुका महिला अध्यक्षा कु.देवी कासार ,तसेच आंघोळीची गोळी सदस्य प्रविण रावल सर , श्री.मुकेश सौदा सर , कु.चैतन्य पोतदार व इतर पर्यावरण मित्र सदस्य इत्यादी उपस्थित पर्यावरण प्रेमींनी परिसरातील झाडांना खिळे मुक्त करण्यास मोलाचे सहकार्य केले. तसेच सदर खिळेमुक्त झाडे कार्यात चाकण पोलीस मा.कोंडे सर यांनी देखिल सहभाग नोंदवला.
दर रविवारी सुट्टीच्या दिवशी वेगवेगळ्या परिरातील एखादा रस्ता निवडून त्या रस्त्याच्या कडेला असणार्या झाडांना जाहिरात फलकांसाठी मारण्यात आलेले खिळे, पिना, बांधण्यात आलेल्या तारा अश्या झाडाच्या जीववर बेतणार्या गोष्टी काढून टाकून झाडालाही मुक्त श्वास घेता यावा यासाठी ही मंडळी प्रयत्न करीत आहेत. स्थानिक दुकानदारांचे प्रबोधन करून झाडांची काळजी घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्याचे काम ही मंडळी करीत आहेत.
“झाडांनाही वेदना होतात,जशा माणसाला होतात….!!
चला झाडांचे खिळे काढूया…
झाडांना वेदनामुक्त करूया…”
या घोषवाक्यासह सादर संस्थेत सहभागी होण्यासाठी नाकरिकांना नागरिकांना मोठ्या प्रमाणात आव्हान केले आहे. सहभागी होण्यासाठी संस्थेचे संस्थापक श्री देवा तांबे (मोबा. ७०५७०५०६४२) यांना थेट संपर्क करण्याचे आव्हान संस्थेमार्फत केले गेले आहे.
]]>