पुणे– मा.श्री.मिलिंदभाऊ एकबोटे (कार्याध्यक्ष, समस्त हिंदु आघाडी) यांच्या मार्गदर्शनाखाली दि.३/१२/१५ रोजी रात्री १० वाजता पुणे सोलापूर मार्गाने २ गायी हाडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुणे कॅम्प येथे बेकायदेशीर असलेल्या कत्तलखान्यात घेऊन चाललेला छोटा हत्ती टेम्पो एम.एच.४२-एम-२८९७ पोलिसांच्या मदतीने समस्त हिंदु आघाडी व अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे सर्वश्री. शिवशंकर स्वामी, विशाल काटे, अविनाश तायडे, कल्पेश भंडारी, अमोल इनामके, पप्पू हजारे, बाबु खेनट, आशिष नेहे, भागवतआगलावे, या गोरक्षकांनी टेम्पो आणि ड्रायव्हरला पोलिसांच्या ताब्यात दिले. ड्रायव्हर कांबळे यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा ( सुधारित १९९५ ) चे कलम (५,६,९,११) प्रमाणे गुन्हा दाखल केला, अशी शिवशंकर स्वामी (मानद पशुकल्याण अधिकारी ) यांनी फिर्याद दिली आणि जनावरांना ‘श्री शिवसमर्थ गोशाळा फाउंडेशन’ मध्ये सोडण्यात आले……. दुसऱ्या एका घटनेत कत्तलीसाठी नेत असलेल्या २० गायींना अभय आयुब शेख व अख्तर कुरेशींना अटक… समस्त हिंदू आघाडीच्या गोरक्षकांनी आज शुक्रवारी दि. ४-१२-२०१५ रोजी कसायांच्या बालेकिल्ल्यात घुसून यशस्वी गोरक्षण केले आणि एकूण २० गायींचे प्राण वाचवले ! वानवडी बाजार येथे या २० गायी कत्तलीसाठी बांधून ठेवल्याची माहिती मा.श्री. मिलिंदभाऊ एकबोटे यांना मिळाली होती. त्यानसार समस्त हिंदू आघाडीच्या जागरूक हेरखात्याने त्वरेने या संदर्भातील माहिती गोळा करून मिलिंदभाऊंपर्यंत पोहोचवली. या माहितीनुसार कार्यवाही करून मा.जॉईंट पोलिस कमिशनर साहेब यांनी या २० गायी ताब्यात घेण्याचे आदेश दिले. या प्रकरणात आयुब शेख आणि अख्तर कुरेशी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीसांनीच कायदेशीर कार्यवाही करून गायी ताब्यात घेतल्यामुळे कसायांना हात चोळत बसण्यावाचून पर्याय उरला नाही. कार्यवाहीस उशीर केल्यावर परिसरात तणाव वाढतो आणि त्याचे गंभीर परिणाम होतात. नंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला जबाबदार कोण असा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे पोलिसांनी सत्वर केलेल्या कार्यवाहीबद्दल मा.मिलिंदभाऊ व सर्व गोरक्षकांच्या वतीने मा.जॉईंट कमिशनर साहेब व सर्व पोलिस बांधवांचे आभार मानन्यात आले. सर्व गायींना विरालयम गोशाळा, जांभूळवाडी , कात्रज किंवा समस्त हिंदू आघाडी संचलित श्री शिवसमर्थ गोशाळा, वाडेबोल्हाई येथे पाठवण्यात येईल प्रचार व प्रसिध्दी विभाग समस्त हिंदू आघाडी, पुणे (अनिकेत मावळे, युवा सह्याद्री प्रतिनिधी, पुणे.)]]>