पुणे:- पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड (कॅम्प/लष्कर भाग) येथील एम. जी. रोड, फॅशन स्ट्रीट, मेन स्ट्रीट व इतर रोड वरती, पे एन्ड पार्क मध्ये दुचाकी साठी ४ रूपये शुल्क असताना पुणेकराकंडून सर्रास १० रुपये आकारले जात आहेत. आश्चर्य! म्हणजे दुचाकीसाठी जी ४ रुपयाची पावती असते, त्या ऐवजी चारचाकी वाहनाची १० रूपयांची पावती दुचाकी पार्किंग करणाऱ्या पुणेकरांना कॅन्टोन्मेंट बोर्डाने नेमलेल्या ठेकेदाराकडून दिली जात आहे. याबद्दल सविस्तर वृत्त असे की, ३०/१०/२०१६ रोजी हा प्रकार आकाश तांबडे याच्या लक्षात आल्यावरती त्यानी या बाबत संबंधित ठेकेदाराच्या कामगाराला विचारला तर तो बोलला “मेरे को दिन का इतना इतना पैसा ठेकेदार को देना पडता है। और टार्गेट पुरा करना पडता है”। अगर मैने टार्गेट पुरा नही किया तो मेरे को खूद की जेब से ठेकेदार को पैसे देणे पडते है,मेरे को पेंमेट नही है। याविषयी त्याला विचारले की, तुझ्या ठेकेदाराला माहिती आहे का तर, तो बोलला, “हा साब उनको सब पता है। त्यानंतर त्याला दुसरा प्रश्न विचारला की, तुला नागरीक काही बोलत नाहीत का? तर त्याने सांगीतले “पब्लिक तो बेवकूफ है,उनको कहाँ टाईम है ये सब देखने को! और कोई ऑब्जेक्शन लिया तो भी हमारा कौन क्या बिगाड़ लेगा? अभी आप जावो साब, धंदे की खोटी मत करो. त्यानी तर त्याला नियमानुसार ४ च रूपये दिले व सांगीतले. “मेरे पास टाईम नही होगा तो भी, ऐसी गलत चिज रोकने लिये मै टाईम निकालता हू”, तुला पैसे घ्यायचे आहेत तर घे, नाहितर नको घेवू! ऐवढे बोलून ते निघून गेले पण त्या कामगाराने दिलेल्या उत्तरातून काही प्रश्न त्याना पडले. “हमारा कोई कुछ नही बिगाड़ सकता” आणी “पब्लिक तो बेवकूफ है”… तसं त्याच्या बोलण्यात तथ्यच आहे म्हणा, “पब्लिक बेवकूफच आहे”. आणि समजा आमच्या सारख्या काही जागरूक नागरिकांनी या बाबत आवाज जरी उचला तरी, तो म्हटल्या प्रमाणे “हमारा कौन क्या बिगाड़ सकता है?” तर आम्ही काय बिघडवू शकतो त्यांच? पोलीसांकडे गेले तर पोलीस सांगतात कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे जा तो त्यांचा विषय आहे आमचा नाही. बोर्डाकडे गेले तर, बोर्डाचे आणी ठेकेदाराचे आर्थिक हितसंबंध असल्यामुळे ते तर बोलण्यास तयार नसतात कारवाई तर दुर राहिली. मग पुणेकरांनी जायचे कोणाकडे? बघीतले गेले तर बोर्ड व पोलीस दोन्ही कारवाई करू शकतात. पार्किंग नियमावली नूसार पार्किंग ठिकाणी आहे तिथे, पार्किंगचे दर दिसतील असे ठळक दर फलक लावावे लागतात. जो कामगार कामाला आहे त्याचे पोलीसांकडून चरित्र पडताळणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. कामगाराकडे ओळखपत्र, गणवेश असणे बंधनकारक आहे. पार्किंग करणाऱ्या वाहनाचे नंबर वही मध्ये लिहून घेणे तसेच पावती वरती वाहनाचा नंबर लिहणे आवश्यक आहे. दुचाकी, चार चाकी पार्किंग च्या जागी पांढरे किंवा पिवळे पट्टे असावेत असे नियम आहेत. पण या पैकी कुठल्याही नियमाची अमलबजावणी ठेकेदाराकडून होत नाही. तरी पण पार्किंगच्या नावाखाली ही पुणेकरांची लूट चालू आहे आणि जो पर्यंत कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन व पुणे पोलीस कारवाई करत नाहीत तो पर्यंत ही पुणेकरांची पार्किंगच्या नावाखाली ही लूट सुरूच राहिल… तरी आशा गोष्टींवर संबंधीत विभागाकडून कारवाई करून लवकरात लवकर आळा घालावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (सदर घटना घडलेल्या ठिकाणा वरील पार्किंगची पावती सोबत जोडत आहोत.) श्रीकृष्ण देशपांडे प्रतिनिधी, सोलापूर]]>