खेड, पुणे: रविवार, दि.१३ जानेवारी, २०१९ रोजी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या (नेफडो) पुणे जिल्हा टीम मार्फत “एक हाक मानवतेची” हा उपक्रम खेड तालुक्यातील देशमुखवाडी गावातील आदिवासी वस्तीवर राबवण्यात आला. सदर विभागातील आदिवासी बांधवांची परिस्थिती अतिशय हालकीची असल्याने पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी या ठिकाणी भेट देऊन त्यांना संस्थेबद्दलची माहिती मा. दिपक भवर यांनी दिली. तसेच संस्थेतर्फे दैनंदिन जीवनावश्यक वस्तू पेन, पेन्सिल, कपडे, साबण, साखर, चहापत्ती अशा बऱ्याच वापरातील वस्तूंचे वाटप करण्यात आले. खेड तालुक्यातील आदिवासी बांधव यांना संस्थेची ही दुसरी भेट होती. अशी माहिती संस्थेचे पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष मा. आकाश भोकसे यांनी दिली.
सदर उपक्रमास मा. रामदास भोईर (मा.सरपंच), मा. ज्ञानेश्वर साळुंके (पोलिसपाटील शिवे), नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. प्रा. दिपक भवर, महाराष्ट्र राज्य युवक महासचिव मा. देवा तांबे, पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष मा. आकाश भोकसे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मा. दिनेश चिगाटे, पश्चिम महाराष्ट्र सचिव मा. तुषार दळवी, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष प्रथमेश दिंडुरे, हवेली तालुका सचिव जगताप, गायकवाड, खेड तालुका अध्यक्ष कुलदीप गरुड, अशोक वाघमारे, इत्यादी संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ, आदिवासी बांधव यावेळी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा. ज्ञानेश्वर साळुंके व आभार प्रदर्शन मा. आकाश भोकसे यांनी केले.
]]>