वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात.वारी हा एक आनंद सोहळा असतो.याच वारीतील वारकरी भक्तांना परमात्मा पांडुरंग त्यांच्या यां भोळ्या आणि प्रामाणिक भक्तीला प्रसन्न होऊन मनातील इच्छा पूर्ण करतो , सुख समाधान देतो.
अशीच एक वारी निघाली आहे, परंतु ही वारी आगळी वेगळी आहे, ही पांडुरंगाच्या भेटीस जाणारी वारी नसून पर्यावरण मित्र संघटना संस्थेची, भारत देशाला हरित करण्यासाठी, प्रदूषण, दुष्काळ, पाणी टंचाई यातून मुक्त करण्यासाठी निघालेली वारी आहे. यां पर्यावरण मित्र संघटनेची वारी, रविवार, दि.१७ जून २०१९ रोजी, आळंदी देवाची यां जगाची आई ज्ञानेश्वर माऊली यांच्या पावन दर्शनाने सुरुवात करून संपूर्ण भारत देशांत पर्यावरण संरक्षनाचा प्रामाणिक संदेश देत आपल्या ध्येय प्राप्ती कडे वाटचाल करत आहे.
पर्यावरण मित्र संघटना, भारत ही संस्था सीमेवर ज्या प्रमाणे आपले आर्मी बांधव अहोरात्र देशसेवा करत आहेत त्याच प्रमाणे प्रामाणिक पर्यावरण कार्य करून संपूर्ण भारत देश हरित करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करीत असलेले, नसानसात पर्यावरण प्रेम असलेले आणि संप्रदायात कित्येक वर्ष पांडुरंग विठ्ठलाच्या सेवेत असलेले मा.श्री.देवा तांबे सर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे.
हें पर्यावरण कार्य योग्य दिशेने वाटचाल करावे व ध्येय सिद्धी प्राप्त व्हावी यां अनुषंगाने संस्थेची पाहिली सभा पुणे जवळील आळंदी देवाची यां ठिकाणी माऊलींचे दर्शन घेऊन संपन्न झाली. यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी आपल्या निवडी बद्दल संस्थेचे संस्थापक श्री.देवा तांबे सर यांचे आभार मानून आपले पर्यावरण विषयक मत स्पष्ट केले. सदर संस्थेच्या स्थापन समारंभास संस्थेचे संस्थापक,राष्ट्रीय अध्यक्ष श्री.देवा तांबे सर, राष्ट्रीय उपाध्यक्षा सौ.वर्षा ताई भांडारकर मॅडम, राष्ट्रीय सचिव श्री.जनार्दन सोनवणे सर ,महाराष्ट्र राज्य महिला सल्लागार सौ.स्नेहा तांबे मॅडम, महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा सौ.कांचन लांघी मॅडम, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ.वैष्णवी ताई पाटील मॅडम, पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ.वंदना पोतदार मॅडम, पालघर जिल्हा अध्यक्ष श्री.विजय चोघळा सर , पालघर जिल्हा सचिव श्री.सुनिल घरत सर, हवेली तालुका अध्यक्ष श्री.चंद्रकांत कांबळे सर, खेड तालुका अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर सोनावणे सर, खेड तालुका सचिव श्री.रूपेश अगरवाल सर, खेड तालुका उपाध्यक्ष श्री.गणेश ब्रम्हे, खेड तालुका युवा अध्यक्ष कु.रामेश्वर बाविस्कर सर ,खेड तालुका महिला अध्यक्षा सौ.सुप्रिया सत्यजित गायधनी मॅडम,वसई तालुका उपाध्यक्ष श्री.लक्ष्मीप्रसाद पाटील सर, वसई तालुका सचिव श्री.सुचित पाटील सर , ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री.रोशन पाटील सर, ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष श्री.विजय साळुंखे सर ,भिवंडी तालुका अध्यक्ष श्री.शशिकांत पाटील सर, भिवंडी तालुका उपाध्यक्ष श्री.किशोर पाटील सर, अकोला जिल्हा अध्यक्ष कु.रवि करे सर ,अकोला जिल्हा उपाध्यक्ष जगजीवनराम कातखेडे सर, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष श्री.राजकुमार व्यास सर, बुलढाणा जिल्हा युवती अध्यक्षा कु.आयुशी दुबे मॅडम, पुणे सदस्य श्री.आनंद पोतदार सर ,श्री.विनायक पाटील सर, ठाणे सदस्य श्री.प्रदिप म्हात्रे सर ,श्री.प्रेम गिराशे सर, श्री.विकास शेलार सर, श्री.अजय साळुंके सर, श्री.लवेश माळसे सर तसेच पुणे जिल्हा विभागातील इतर पर्यावरण प्रेमी सदस्य उपस्थित होते.
]]>