पुणे(सुजीत खोत): सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन आयोजित १४ व्या राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत दिनांक १५ डिसेंबर २०१६ रोजी यशोदा इंग्लिश स्कूलने अनिल पाटील लिखित आणि सुजीत खोत दिग्दर्शित ‘बालवीर’ ही नाटीका सादर केली. या स्पर्धेत कोल्हापुर आणि पुणे केंद्रातून जवळ जवळ ७५ नाटकांचे सादरीकरण झाले. कोल्हापुर केंद्रामधून ‘राखेतून उडाला मोर’ या नाटकास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक तर प्रकाश योजनेमध्ये यशोदा इंग्लिश स्कूल, सावर्डेच्या ‘बालवीर’ या नाटकास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. विजेत्यांचे अभिनंदन. सर्व पुरस्कार विजेत्यांचे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री मा. विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे]]>