मंचर:- काल दिनांक 18.6.16 रात्री 10.15 च्या सुमारास मंचर पोलिस स्टेशनच्या हद्दीतून मुंबईकड़े जाणारा एक पिकअप टेम्पो Mh.26.H.4168 मधून गोमांस घेऊन जात असल्याचा संशय आल्याने मंचर बसस्थानकाजवळ बजरंग दलाचे गोरक्षक प्रसाद बोर्हाडे, अक्षय चिखले, विशाल थोरात, रवि लोखंडे, प्रतिक बनबेरु, अनिल विरणक, गणेश पिंगळे, विशाल बाणखेले, शुभम गवळी आदी कार्यकर्त्यांनी गाडी थांबविली व वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्याशी संपर्क करुन सर्व माहिती पोलिसांना दिली. थोड्या वेळातच पोलिस आले व गाड़ी मंचर पोलिस स्टेशन येथे आणली. ड्रायव्हरकडेवचौकशी केली असता, त्याने जुन्नर येथून गोवंश कापून घेऊन मुंबईकड़े जात असल्याचे सांगितले. पशुसंवर्धन डॉ.चिखले यांनी गाडीत उतरुन मांस चेक करत असताना त्यात गोवंशाचे पिवळे मांस दिसले. व या संदर्भात फिर्याद देऊन संबधीतांवर कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी तालुका संयोजक-सुहासभाऊ बाणखेले, उपसरपंच महेशभाऊ थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व पोलिस, अधिकारी, यांचे मनःपूर्वक आभार..! बजरंग दल आंबेगाव प्रखंड (अनिकेतराव मावळे पुणे)]]>