महाराष्ट्र डर्बीत पुणे पुन्हा एकदा सरस, रोखला मुंबईचा विजयीरथ

रोहित शर्माची अर्धशतकीय खेळी वाया. बेन स्टोक्सचे निर्णायक १९ वे षटक ठरले मुंबईच्या विजयात अडथळा. सलग सहा सामने जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सला आठ सामन्यांमध्ये दोनदा पराभवाची चव चाखावी लागली आणि दोन्ही वेळेस शेजारी रायसिंग पुणे सुपरजायंटने मुंबईला नमविले. स्थळ पुणे, सामना पुणे विरुद्ध मुंबई. पुण्याच्या संघाने दोन वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा ७ गडी राखून दारुण पराभव केला. महाराष्ट्र डर्बीत आज पुन्हा एकदा पुणे संघाने मुंबईवर भारी होत रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला त्यांच्याच घराच्या मैदानावर पराभूत करीत मुंबईच्या सलग सहा सामान्यांच्या विजयाचा रथ रोखला. १६१ धावांचे आव्हान पेलण्यास उतरलेल्या मुंबई इंडियन्सला ३ धावांनी मात देत पुणे संघाने आपला चौथा सामना जिंकला. कर्णधार रोहित शर्माचे झुंझार अर्धशतक संघाच्या कमी आले नाही. मुंबई इंडियन्सचा ‘मेंटॉर’ सचिन तेंडुलकर आज आपला ४४ वा वाढदिवस करत असताना मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून अपेक्षेप्रमाणे गोलंदाजी घेतली आणि महाराष्ट्र डर्बीमध्ये पाहुण्या रायसिंग पुणे सुपरजायंटला फलंदाजीसाठी पाचारण केले. फॉर्मात असलेला कृणाल पांड्या आज दुखापतीमुळे खेळू शकला नाही आणि त्याच्या जागी कर्ण शर्माला मुंबई इंडियन्ससाठी पदार्पणाची संधी मिळाली. पुण्याची सॉलिड सुरुवात सहापैकी तीन सामने गमावलेल्या पुणे संघाला वानखेडेच्या खेळपट्टीवर पहिली फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारणे हेच पहिले लक्ष्य होते. मुंबईकर अजिंक्य रहाणेने पुण्याचा राहुल त्रिपाठीच्या साथीने डावाची सुरुवात केली. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कव्हरच्या वर षटकार मारून आपण सज्ज आहोत याचे संकेत दिले. त्रिपाठीनेही रहाणेला चांगली साथ देत पावरप्ले पर्यंत धावसंख्या आठच्या सरासरीने ४८ वर नेऊन ठेवली. मागच्या सामन्यात अर्धशतक झळकावलेला राहुल त्रिपाठी आज मुंबईच्या अनुभवी गोलंदाजांना न डगमगता सामना करताना दिसला. अचूक फटाके, उत्कृष्ठ टायमिंग यांचे प्रदर्शन येथील प्रेक्षकांना देत होता. आठव्या षटकात त्रिपाठीने मॅकक्लेघनला तीन चौकार ठोकत १४ धावा कुटल्या. पदार्पण करणाऱ्या कर्ण शर्माने दहाव्या षटकात एका छोट्या बाऊंसरवर रहाणेला बाद करीत ७६ धावांची पहिल्या गड्याची भागीदारी फोडली. पुण्याच्या पहिल्या गड्याच्या सर्वोत्तम भागीदारीची बरोबरी करण्यास ही जोडी केवळ दोन धावांनी कमी पडली. मुंबईची समाधानकारक गोलंदाजी दहा षटकांत केवळ गडी गमावणाऱ्या रायसिंग पुणे सुपरजायंट संघाला हवी तशी धावसंख्या उभारता आली नाही. खेळपट्टीवर तग धरून बसलेल्या राहुल त्रिपाठीला कर्ण शर्माने पोलार्डकरवी झेलबाद केले. त्याने ३१ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह सर्वाधिक ४५ धाव केल्या. त्रिपाठी बाद झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर हरभजन सिंगने कर्णधार स्मिथचा सोपा झेल सोडला आणि उपस्थित प्रेक्षकांमध्ये कमालीची शांतता पसरली. हरभजने लगेच पुढचे षटक घेत स्मिथ क्लीन बोल्ड केले आणि झालेल्या नुकसानीची भरपाई केली. स्मिथ (१२ धावा, २ चौकार) बाद झाल्यानंतर पुणे संघ मोठे फटाके मारण्याच्या नादात ठराविक अंतरावर गडी गमावू लागला. धोनी (७ धावा), बेन स्टोक्स (१७ धावा, २ चौकार) हे स्वस्तात परातल्यानंतर मनोज तिवारीने (१३ चेंडू, २२ धावा, ४ चौकार) थोडासा प्रयन्त केला परंतु शेवटच्या षटकात जसप्रीत बुमराने त्यालाही तंबूत धाडले. पुणे संघ २० षटकांत ६ गडी गमावत १६० धावा करू शकला. मुंबईतर्फे कर्ण शर्मा, जसप्रीत बुमराला प्रत्येकी २ तर मिचेल जॉनसन, हरभजन सिंघल प्रत्येकी १ गडी बाद करता आला. सुरुवात गडबडली मुंबई इंडियन्सने जिंकलेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामन्यांत धावांचा पाठलाग यशस्वीरीत्या केला आहे. याही सामन्यात १६० धावांचे लक्ष्य पार करण्यास उतरलेल्या पार्थिव पटेल – जोस बटलर जोडीने काहीशी आक्रमक सुरुवात करीत सातव्या विजयाकडे कूच केली. तिसऱ्या षटकात युवा वॊशिंग्टन सुंदरला पार्थिव पटेलने तीन चौकार खेचत दमदार सुरुवात केली. वानखेडेच्या मैदानावर विशेषतः दुसऱ्या डावात दव महत्वाचा भाग येत असल्यामुळे स्मिथने आपले स्पिनर्स सुरुवातीपासूनच कामाला लावले. पहिल्या चार षटकांत बळी न मिळाल्यामुळे स्मिथने बेन स्टोक्सला पाचारण केले आणि त्याने त्याच्या इंग्लंडचा सहकारी जोस बटलरला बाद करीत मुंबईच्या डावाला गळती पडण्यास सुरुवात केली. बटलर (१७ धावा, १३ चेंडू, ३ चौकार) बाद झाल्यानंतर आलेला राणाही अडखळताना दिसला.  तोही ९ चेंडू खेळून फक्त ३ धावांत डॅनियल ख्रिस्तनचा शिकार ठरला. मधली ‘बचाव’ फळी फेल यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सने आपल्या मधल्या फळीच्या जोरावर जवळजवळ सर्वच सामने जिंकले आहेत. रोहित शर्मा, पोलार्ड, पांड्या ब्रदर्स, नितीश राणा या सर्वानी मोक्याच्या क्षणी भरवशाची फलंदाजी करीत मुंबईला सामने जिंकून दिले आहेत. बढती मिळालेल्या कर्ण शर्माला मनोज चार धावांवर कव्हर्सला सोपा झेल सोडत जीवनदान दिले आणि कर्ण शर्माने पुढच्याच चेंडूवर षटकार ठोकत इम्रान ताहिरला दबावात आणले. परंतु कर्ण शर्माला या जीवदानाला फायदा उचलता आला नाही व तो बेन स्टोक्सच्या पुढच्याच षटकात १० धावांवर त्रिफळाचित होत तंबूत परतला. १२ व्या षटकात मुंबई इंडियन्सची अवस्था ४ बाद ८६ अशी झाली. मागच्या रविवारी गुजरात लायन्स विरुद्ध नाबाद ४० धावांची खेळी करणारा रोहित शर्मा आज आक्रमक पण थोडासा सावध दिसला. एकीकडे एकामागून एक गडी बाद होत असताना रोहित शर्माने दुसऱ्या बाजूने डावाला गती दिली. इम्रान ताहिरच्या फिरकीला अगदी सहजपणे खेळत तुफान फटकेबाजी केली. रोहितने ताहिरला ३ चौकार व १ षटकारही खेचला. रोहितचा मुंबईकर साथीदार शार्दूल ठाकूरलाही एक उत्तुंग षटकार खेचत पुन्हा फॉर्मात आल्याचे संकेत दिले. शेवटच्या दोन षटकांत २४ धावा हव्या असताना स्मिथने आपले प्रमुख अस्त्र बेन स्टोक्सच्या हाथी चेंडू सोपवला व त्याने ६ सिंगल व एक वाईड देत केवळ ७ धावा दिल्या. शेवटचे षटक जयदेव उनादकतने व्यवस्थित रित्या टाकत रोहित शर्मा व हार्दिक पांड्या यांचा बळी घेत पुण्याला ३ धावांनी जिंकून दिला.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *