राज्य अपंग पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले

जळगाव दि.२ – जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून दरवर्षी ३ डिसेंबर रोजी केंद्र शासनातर्फे उत्कृष्ट कर्मचारी, उद्योजक, नियुक्तक, सेवायोजन अधिकारी, संस्था, प्रतिथयश व्यक्ती इत्यादींना राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विभागामार्फत सन १९८२ पासून प्रतिवर्षी अपंग राज्य पुरस्कार देण्यात येतो. अपंग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी केंद्र शासनाच्या, सामाजिक न्याय व अधिकारीता विभागाकडून दरवर्षी पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येतात. या अर्जामधूनच महाराष्ट्र राज्याच्या, सामाजिक न्याय विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या अपंग कल्याण राज्य पुरस्काराची निवड करण्यात येते. यामध्ये स्वयंद्योजक करणाऱ्या अपंग व्यक्ती किंवा अपंग कर्मचारी यांना उत्कृष्ट अपंग कर्मचारी, स्वयं उद्योजक पुरस्कार देण्यात येतो. सदरचा पुरस्कार शासकीय, निमशासकीय क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्रामधील अंध, अस्थिव्यंग, कर्णबधिर व मतिमंद प्रवर्गातील व्यक्तींना देण्यात येतो. तसेच जास्तीत जास्त अपंग व्यक्तींना त्यांच्या आस्थापनेत नोकरी उपलब्ध करुन देणाऱ्या शासकीय, सार्वजनिक, खाजगी क्षेत्रातील संस्थेला उत्कृष्ट नियुक्तक म्हणून अपंग राज्य पुरस्कार दिला जातो. यावर्षी राष्ट्रीय पुरस्कारासाठी अपंग कर्मचारी, स्वयंदयोजक या प्रकारामध्ये (अंध-२, मतिमंद-१, कर्णबधिर-९, अस्थिव्यंग-२१) एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. हे प्रस्ताव पुनश्च सादर करण्याची आवश्यकता नाही. तसेच उत्कृष्ट नियुक्तक या प्रकारात या वर्षी कोणाताही अर्ज प्राप्त झालेला नाही. यापूर्वी वरील दोन्ही पुरस्कारासाठी पाठविलेल्या अर्जाचा केंद्र शासनाकडून पुरस्कार न मिळलेल्या व्यक्ती, संस्थांची राज्य शासनाच्या अपंग कल्याण राज्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यांत येईल, याची नोंद घ्यावी. उपरोक्त पुरस्काराचे अर्ज (अ) सर्वोत्कष्ट अपंग कर्मचारी, स्वयंउद्योजक फॉर्म ए (ब) अपंग व्यक्तींच्या नियुक्तीसाठी कार्य करणाऱ्या संस्था (नियुक्तक) फॉर्म बी हे अर्ज विहित नमुन्यात मराठीमधील संक्षिप्त माहितीसह दोन प्रतीत आवश्यक त्या कागदपत्रांसह बातमी प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसाच्या आत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद, जळगाव यांनी कळविले आहे. सागर कुळकर्णी,जळगाव युवा सह्याद्री प्रतिनिधी]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *