प्रत्यूषाची आत्महत्या जिवारी लागते मग शेतकऱ्यांच काय?

All these senseless suicides which achieve nothg! Life is God’s gift for us to live not for us to take at will. We have no right to do that.

— Hema Malini (@dreamgirlhema) April 4, 2016 नेहमीच आपल्या ‘वाद्ग्रस्थ’ विधानांनी प्रसिद्धीच्या झोतात राहणारी ‘राखी सावंत’ या वेळी काही मागे राहिली नाही. तिने एक पत्रकार परिषद घेऊन आपला ‘ड्रामा’ पुन्हा एकदा माध्यमांच्या पुढे सादर केला. तिच्या म्हणण्यानुसार प्रत्यूषाची आत्महत्या खूप दुखद आणि मनाला मन हेलावणारी घटना होती. प्रत्यूषा आपल्या घरात कमावती एकटी होती. तिच्या जाण्यामुळे तिच्या कुटुंबाला सरकारी मदत म्हणून सरकारने ५ कोटी रुपये द्यावे. तसेच सरकारने लवकरात लवकर सिलिंग पंख्यावर बंदी आणावी, जेणेकरून अश्या प्रकारच्या आत्महत्या थांबतील. तिने यावेळी असेही कबूल केले कि ती लवकरच गरीब कुटुंबाना ५००० टेबल पंखे वाटेल. राखीच्या या पत्रकार परिषदेवरून जन सामान्यांना एक प्रश्न नक्कीच पडला आहे की, या राखीला जर तिची मैत्रीण प्रत्यूषा हिच्या मृत्यूबद्दल इतकी कळकळ आहे तर मग दुष्काळात सापडलेल्या महाराष्ट्रातील गरीब शेतकर्यांविषयी कधी दया का नाही वाटत? जर आत्महत्येला सरकारी मदत म्हणून ५ कोटी रुपयांची मागणी असेल तर मग दीन दुबळ्या शेतकऱ्यांनी काय गुन्हा केलाय? महाराष्ट्रात दर वर्षी दुष्काळामुळे हजारो शेतकरी आत्महत्या करतात. त्यांच्या मदतीसाठी हाताच्या बोटावर मोजणारे कलाकार ज्यांना खरंच शेतकऱ्यांची दया आहे ते पुढे येउन मदत करतात. हे ५ कोटी मदत राखी सावंत कोणत्या आधारावर मागते? तसेच तिने हेही म्हटले कि तिच्याकडे या प्रकरणातील पुरावा आहे जो ती प्रसार माध्यमांना देऊ शकत नाही. जर तिच्याकडे पुरावा आहे मग तिने अजून पोलिसांना का नाही सुपूर्द केला? आत्महत्या करणे जरी आता गुन्हा राहिला नसला तरी इतक्या टोकाचा निर्णय घेणे हाही खूप वाईट आहे. देवाने दिलेले सुंदर आयुष्य नक्कीच माणसाने आनंदी राहून जगले पाहिजे. आयुष्य म्हटलं कि ताण तणाव हा येतोच. पण आयुष्य संपवून या तणावापासून मुक्ती मिळवणे हा यावरचा पर्याय नाही. आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणींना सामोरे जाऊन माणसाने आयुष्य जगले पाहिजे.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *