'गोल्डन टॉयलेट' ठरला राज्यातील सर्वोत्तम लघुपट

चिंतामणी कलामंच आयोजित ‘पालवी’ राज्यस्तरीय लघुपट स्पर्धा २०१९

मुंबई: नवेदित कलाकारांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीच धडपड करणाऱ्या चिंतामणी कलामंच (मुंबई) आयोजित राज्यस्तरीय लघुपट महोत्सवात ‘गोल्डन टॉयलेट’ लघुपटाने प्रथम क्रमांक फटकावला तर ‘प्रॉन्स’ला द्वितीय व ‘प्रश्नचिन्ह’ ला तृतीय क्रमांक फटकावला. दादर येथील प्लाझा चित्रपटगृहात आयोजित या स्पर्धेत राज्यभरातील विविध स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचे उद्घाटन प्लाझा सिमेनाचे व्यवस्थापक योगेश मोरे, प्रमुख पाहुणे रोहित भारद्वाज व प्रसिद्ध जीवरक्षक राजेश कांची यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास अभिनेते निनाद लिमये, संतोष हसूरकर, टायगर ग्रुपचे संजय खंडागळे, छायाताई खंडागळे, दीपक गुप्ता, स्वप्नील धुरी, अभय राणे आदी मान्यवरांनी उपस्थिती दाखवली. १५ लघुपटांत झालेल्या अंतिम फेरीत ‘राजू – द लाईफ सेवियर’ व ‘स्वच्छ भारत’ यांना विशेष ज्युरी पुरस्काराने गौरवण्यात आले. सर्वोत्कृष्ट लेखक व दिग्दर्शक पुरस्कार ‘गोल्डन टॉयलेट’च्या उमेश मालन यांनी फटकावला. सर्वोत्कृष्ट छायाचित्रण – अमित घाडीगावकर, सर्वोत्कृष्टसंकलन – संकेत कोकाटे, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – कुणाल-करण, सर्वोत्कृष्टअभिनेता – शरद जाधव, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – दीपा मालकर व सर्वोत्कृष्ट बालकलाकार लक्ष्मीकांत लिंगायत ठरले.

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *