जळगाव: हतनूर प्रकल्पाने बाधीत झालेल्या गावांच्या पूर्नवसनाची कामे संबंधीत अधिकाऱ्यांनी द्रूत गतीने पूर्ण करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांनी आज नियोजन भवनात झालेल्या पूनर्वसन प्रलंबित कामाच्या आढावा बैठकीस उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीस रावेरच्या खासदार श्रीमती रक्षा खडसे, आमदार व माजी महसूल मंत्री श्री. एकनाथराव खडसे, भुसावळचे आमदार संजय सावकारे, अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय मस्कर, फैजपूरचे प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर, भुसावळचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, संबधीत गावांचे सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देवून ग्रामस्थांच्या भावना व समस्या जाणून घेवून तत्काळ निर्णय घ्यावा. कामात कसूर करणाऱ्या कंत्राटदारांवर कडक कार्यवाही करावी. ज्या नागरिकांनी सामाजिक भावनेतून आपल्या जमीनी दिल्या त्यामुळे असे मोठे सिंचन प्रकल्प उभारले गेले. त्यांना आपण वेळीच न्याय देणे आपले कर्तव्य आहे. यानंतर होणाऱ्या बैठकीत पूर्नवसन कामांच्या प्रगतीचा वेग दिसला पाहिजे, अन्यथा कडक कार्यवाहीस सामोरे जावे लागेल अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. या बैठकीत भुसावळ, मुक्ताईनगर, जळगाव, रावेर तालुक्यातील एकूण ३३ गावातील भुसावळ तालुक्यातील टहाकळी, मुक्ताईनगर तालुक्यातील मेहूण, चिंचोल, चांगदेव, कोथळी, मुक्ताईनगर, घोडसगाव, चिंचखेडा, खामखेडा, मेळसांगवे, शेमळदे, पंचाणे, मुंढोळदे, उचंदे, मेंढोदे, पिंप्रीनांदू, धामंदे, अंतुर्ली, जळगाव तालुक्यातील कुंड, रावेर तालुक्यातील मांगलवाडी, तांदलवाडी, सिंगत, पुरी, गोलवाडे, भामलवाडी, शिंगाडी, कांडवेल, ऐनपूर, निंबोल, बोहार्डे, पातोंडी, धुरखेडा, अजनाड गावातील पुर्नवसनाबाबत बाब निहाय आढावा घेण्यात आला. यावेळी त्या त्या गावांचे सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. आमदार व माजी मंत्री श्री. एकनाथराव खडसे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी ही मार्गदर्शन केले.]]>