जळगाव(सागर कुळकर्णी): ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाच्या अंमलबजावणीला दि.२४ रोजी दोन वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. या कालावधीत केलेल्या कामगिरीचे मुल्यमापन केंद्रीय महिला व बालकल्याण विभागामार्फत करण्यात आले. त्या आधारे देशातील सर्वोत्कृष्ट १० जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून त्यात जळगाव जिल्ह्याचाही समावेश आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला महिला एवं बालविकास मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून पत्र प्राप्त झाले असून, त्यानुसार जिल्ह्याने प्रभावी जनजागृती केल्याबद्दल जळगाव जिल्ह्याचा सर्वोत्कृष्ट १० जिल्ह्यात समावेश झाला आहे. यासंदर्भात मंगळवार दि.२४ रोजी राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त नवी दिल्ली येथील प्रवासी भारतीय केंद्र, चाणक्यपूरी येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना आमंत्रित करण्यात आले आहे. तसे पत्र जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे.]]>