हिंदूंच्या संघटनांची आवश्यकता प्रतिपादणारा प्रसंग ! वाद्य बंद करण्यास दमदाटी चोपडा (जिल्हा जळगाव) – येथील धर्मांधांनी वयोवृद्ध हिंदु महिलेची सवाद्य निघालेली अंत्ययात्रा रोखली. ‘दुसरी गल्ली से जाओ, यहा से नही जाना’, असे दटावून हिंदूंना वाद्य बंद करण्यास भाग पाडले. ७० वर्षीय हिंदु महिलेची अंत्ययात्रा परिसरातील एका अनधिकृत मशिदीजवळून जात असतांना २० ते २५ धर्मांध धावत अंत्ययात्रेजवळ आले. त्यांनी हिंदुंशी हुज्जत घातली. त्यांची दमदाटी थांबत नसल्याने शेवटी हिंदूंनी वाद्य बंद करून अंत्ययात्रा पुढे नेली. या संदर्भात पोलिसांनीही काहीच कारवाई केली नाही. ‘अंत्ययात्रा ही दुःखद घटना असून ती रोखली जाऊ नये’, असे संतप्त हिंदु या वेळी बोलत होते. या अशा मुर्दाड कायद्याच्या रक्षकांचा आम्ही जाहिर शब्दांत धिक्कार करतो.]]>
Related Posts
नवसाला पावणारी भगूरची रेणुका माता
भगूरचे श्री रेणुका माता मंदिर एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे, ज्याची स्थापना भृगु ऋषींनी केली असल्याचे मानले जाते. या…