जळगाव: जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन साजरा झाला. जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांच्या तक्रारी जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी त्यांच्या जागी जाणून घेतल्या व त्या सोडवणूक करण्यासाठी तक्रार अर्ज संबधीत विभागाकडे देण्यात आले. आज एकूण १४४ तक्रार अर्ज दाखल झाले असून विभागवार अर्ज पुढील प्रमाणे :- महसुल विभाग-५८, जिल्हा उपनिबंधक सह. संस्था, जळगाव-२५, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. परिषद जळगाव -३७, पोलीस अधिक्षक,जळगाव ११, अधिक्षक भुमी अभिलेख जळगाव-१, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी जळगाव-१, अधिक्षक अभियंता म. रा. वि.म. जळगाव-१, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगाव-१, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) जळगाव-१, आयुक्त म.न.पा. जळगाव शहर-२, प्रधान सचिव (महसुल) मुंबई -१, जिल्हा अग्रणी बँक, जळगाव -१, जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, जळगाव-१, उप संचालक नाशिक-१, भुजल सर्वेक्षण विभाग जळगाव-१, आणि प्रकल्प अधि. आदिवासी प्रकल्प यावल-१ असे आहेत. जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना संबोधीत करताना सांगितले की, आपआपल्या विभागात आलेल्या तक्रारींचा आढावा लोकशाही दिनापूर्वी घ्यावा, किती तक्रारी प्राप्त झाल्या किती प्रलंबीत आहे. प्रलंबीत राहण्याची कारणे आदि माहितीसह पुढील लोकशाही दिनी उपस्थित राहावे.]]>
Related Posts
नवसाला पावणारी भगूरची रेणुका माता
भगूरचे श्री रेणुका माता मंदिर एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे, ज्याची स्थापना भृगु ऋषींनी केली असल्याचे मानले जाते. या…