नाशिक (भगुर):- आयुष्याचा अखेरच्या क्षणापर्यंत फक्त अखंड हिंदुराष्ट्रासाठी मातृभुमीच्या स्वातंञ्यासाठी आतोनात हाल सोसलेले व आपला देह मातृभुमीसाठी झीजवनारे भगुरपुत्र स्वातंञ्यवीर वि.दा.सावरकर यांच्या जन्मगावी भगुर येथे असलेले स्मारक आज खऱ्या अर्थाने नावारुपाला येत आहे. गेल्या १ दिड महिण्यापासून स्मारकाच्या नुतनीकरणाचे, डागडुजीचे काम चालू आहे. तेथील होत आसलेल्या कामांचा दर्जाही चांगला असून, कामे उत्तमरित्या चालू आहेत. या महान क्रांतिकारकाचा जन्म सन २८ मे १८८३ रोजी याच वाड्यात झाला. मागील काही वर्षांपूर्वी ही वास्तु पुरातत्व विभागाने ताब्यात घेवून, भव्य असे स्वातंञ्यवीर सावरकरांचे स्मारक उभारुन, तत्कालीन मुख्यमंत्री श्री. मनोहर जोशी यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. कालांतराने तेथील काही वस्तु, भिंती जीर्ण झाल्याने तेथील डागडुजी करणे गरजेचे असतांना व स्मारक अजून कसे आद्ययावत करता येईल या दृष्टिकोनातून खासदार श्री हेमंत गोडसे यांनी पुढाकार घेवून शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन स्मारकाच्या नुतनीकरणासाठी निधि उपलब्ध करुन दिला आहे. भगुरमध्ये आद्ययावत होत असलेले हे स्मारक भगुरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. दर वर्षी स्वातंञ्यवीर सावरकर स्मारकाला भेट देणाऱ्या देशभक्त पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भव्य दिव्य होत आसलेल्या स्मारकामुळे पर्यटक जास्त प्रमाणात भगुरमध्ये येतील. यामुळे येथील व्यवसायीकांना पर्यटकांचा हात भार लागेल व व्यवसाय नक्कीच तेजीत येतील. तसेच स्थानिकांना यामुळे रोजगार देखील उपलब्ध होईल. स्मारक नुतनीकरणामुळे स्वातंञ्यवीर सावरकर प्रेमींचा व पर्यटकांचा ओघ निश्चितच वाढिला लागेल व भगुरच्या अर्थकारणावरही याचा परिणाम जाणवेल… (श्री मनोज कुवर, भगुर शहर युवा सह्याद्री प्रतिनिधी)]]>