जळगाव, जामोद प्रतिनिधी :- जामोद पोलीस स्टेशन परिसरात नव्याने उभारल्या जाणाऱ्या प्रशासकीय पोलीस इमारतीचा भुमिपूजन सोहळा आज संपन्न झाला.
भुमिपूजन सोहळ्याला बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात, जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. श्रीकांत निचळ यांच्यासह पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
नवीन पोलीस स्टेशन प्रशासकीय इमारतीमुळे नागरिकांना अधिक सुरक्षित वातावरण मिळेल आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचे पाऊल ठरेल. प्रशासनाच्या प्रभावी सेवेसाठी आणि आधुनिक सुविधा असलेल्या पोलीस स्टेशनसाठी हा नक्कीच ऐतिहासिक क्षण आहे.
