नॉर्थईस्ट युनायटेड एफसी (एनईयुएफसी) करणार निवासी युथ अकॅडमीची सुरुवात आठ राज्यांमध्ये शोधणार फुटबॉलमधील प्रतिभांवत खेळाडू

मुंबई : 19 जुलै, 2017 : सुपरस्टार जॉन अब्राहम याच्या मालकीच्या नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने (एनईयुएफसी) आपल्या विभागातीला आठ राज्यांमधील फुटबॉलमधील प्रतिभावंत खेळाडू शोधण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले असून याकरता निवासी युथ अकॅडमीची सुरुवात करणार आहे. यासाठी सेंटर ऑफ ए्निसलंस शिलॉंग येथून कार्यरत राहणार असून या माध्यमातून निवडक मुलांना सराव, शिक्षण व स्पर्धांचा अनुभव वर्षभर घेता येणार आहे. या अकॅडमीबाबत घोषणा करत असताना माझे स्वप्न ख-या अर्थाने सत्यात उतरले असल्याचे जॉन अब्राहमने सांगितले. मी जेव्हा तीन वर्षापूर्वी संघासाठी बोली लावली तेव्हा येथील प्रतिभावंत मुलांसाठी निवासी अकॅडमी सुरु करण्याचे माझे पहिले लक्ष्य होते. प्रत्येक प्रतिभावंत खेळाडूला एनईयुएफसीच्या मुख्य संघामध्ये खेळण्याची संधी मिळावी यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. असे जॉन अब्राहम म्हणाला. या विभागातील फुटबॉलला आणखीन चालना मिळावी याकरता नॉर्थईस्ट युनायटेड एफसी (एनईयुएफसी) ने शिलॉंग युनायटेड एफसी ज्याला रॉयल वाहिंग्दोह एफसी या नावाने देखील ओळखले जाते त्यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे. आम्ही एनईयुएफसी सोबत फुटबॉलच्या विकासासाठीचा हा प्रकल्प राबविण्यासाठी उत्सुक आहोत असे शिलॉंग युनायटेड व पार्टनर युथ डेव्हलपमेंटचे मालक डॉमनिक तारीआंग यांनी सांगितले. भारताच्या ईशान्य भागातील प्रतिभावान खेळाडूंसाठी आम्ही चांगला पाया रचला असून राष्ट्रीय स्तरावर हे कौशल्य सर्वांना दिसले पाहिजे असे जॉन म्हणाला.ईशान्य भागातील फुटबॉलवर विश्वास दाखवल्याने मी जॉन अब्राहम व एनईयुएफसी यांचा आभारी आहे. असे डॉमनिक तारीआंग म्हणाले. आमच्या या समन्वयाचा फायदा शिलॉंगमधील फुटबॉलसोबत या विभागातील इतर भागांना देखील होईल असे तारीआंगने सांगितले. डॉमनिक व शिलॉंग युनायटेडच्या रुपात आम्हाला चांगले साथीदार मिळाले आहे. या भागातील फुटबॉलसाठी आम्ही नेहमीच तत्पर असू असे जॉन म्हणाला. दोन ्नलबच्या माध्यमातून सेंटर ऑफ ए्निसलंससाठी सर्वोत्तम विद्यार्थ्यांची निवड करतील व त्यांना सराव आणि शिक्षणासोबत वर्षभरासाठी स्पर्धांचा अनुभव देखील मिळणार आहे. शिलॉंग युनायटेड यांचा राजधानीमध्ये मजबूत पाया आहे. त्यामुळे निवड झालेल्या खेळाडूंना शिलॉंग स्टेट लीग व इतर स्पर्धांमध्ये आपले कौशल्य दाखविण्याची संधी देखील मिळणार आहे.सेंटर ऑफ ए्निसलंसच्या माध्यमातून 13, 15 व 18 वर्षाखालील संघ तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे भविष्यात या खेळाडूंना एनईयुएफसी मध्ये खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *