नवी मुंबईकर तनिष्क गवतेने ठोकल्या १०४५ धावा, शालेय स्पर्धेत नवा विक्रम?

नवी मुंबई: तुम्हाला प्रणव धनावडे हे नाव आठवतं का? होय, शालेय स्पर्धेत ज्याने विक्रमी १००९ धावांची खेळी केली होती तोच तो. म्हणतात ना कि जे क्रिकेटमध्ये विक्रम केले जातात ते मोडण्यासाठीच. त्याचीही प्रचिती आली ती आज नवी मुंबई येथील कोपरखैरणे मधील यशवंतराव चव्हाण स्कूल ग्राउंडमध्ये. तनिष्क गवते या १३ वर्षीय पट्ट्याने दोन दिवसांच्या अंडर १४ नवी मुंबई शिल्ड क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तब्बल १०४५ धावांची मॅरेथॉन खेळी करीत एका नव्या विक्रमला गवसणी घातली. यशवंतराव चव्हाण स्कूलने विरुद्ध यशवंतराव चव्हाण इंग्लिश स्कुल यांच्यात रंगलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तनिष्क गवते याने ५१५ चेंडूंचा सामना करीत १४९ चौकर व ६७ षटकार ठोकत नाबाद १०४५ धावा कुटल्या. पहिल्या दिवशी ४१० धावांवर नाबाद असलेल्या तनिष्कने आज प्रणव धनावडेच्या नावावर असलेला १००९ धावांचा विक्रम मोडीत काढला. तथापि, नवी मुंबई अंडर १४ शिल्ड स्पर्धा हि मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त नसल्यामुळे याला म्हणावे तसे महत्व मिळत नाही. तनिष्कचे प्रशिक्षक मनीष यांच्याशी युवा सह्याद्रीने संपर्क केला असता त्यांनी सांगितले कि या स्पर्धेत लेदरचा चेंडू वापरला गेला होता. शिवाय या स्पर्धेतील मैदान हे मोठंही होतं. लेग साइड्ची बाउंड्री हि ६०-६५ यार्ड तर ऑफ साइड्ची बाउंड्री हि ५० यार्ड लांब होती.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *