बेळगाव (कर्नाटक) – ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलवीत या मागणीसाठी बेळगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने तहसीलदार श्री. रवी वाघमारे आणि पोलीस उपायुक्त श्री. अनुपम अग्रवाल यांना निवेदन देण्यात आले. श्री. अग्रवाल यांनी सांगितले की, अपप्रकार रोखण्यासाठी पूर्ण लक्ष देऊ आणि तुम्हालाही अपप्रकार आढळल्यास पोलिसांना त्वरित कळवा. या वेळी श्रीराम सेनेचे प्रवक्ता श्री. मारुती सुतार, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सुधीर हेरेकर, ऋषिकेश गुर्जर, सनातन संस्थेच्या सौ. अर्चना लिमये, सर्वश्री आबा सावंत, महादेव चौगुले, हिंदु धर्माभिमानी श्री. व्यंकटेश शिंदे आणि श्री. सचिन इनामदार उपस्थित होते. त्याच बरोबर जत येथे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. जत (जिल्हा सांगली) येथे याच मागणीसाठी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. या वेळी डफळापूर येथील सरदार यशवंतराव जाधव आणि श्री. अशोक चव्हाण यांच्यासह हिंदु जनजागृती समितीचे श्री. इरगोंडा पाटील, श्री. गुरुबसव हत्ती, सौ. नीला हत्ती, सौ. संगीता पट्टणशेट्टी, सौ. मंदा जिगजेनी, सौ. जयश्री कांबळे, सौ. सावित्री स्वामी उपस्थित होत्या.]]>