बेळगाव:- आज दि. ६ जानेवारी रोजी रंगुबाई पैलेस येथे शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक बोलविण्यात आली होती. १७ जानेवारी हा दिवस सिमा भागात हुतात्मा दिन म्हणुन पाळला जातो याच दिवशी १९५६ रोजी सीमाभागात झालेल्या गोळीबारात ५ जण हुतात्मे झाले होते. खऱ्या अर्थाने संयुक्त महाराष्ट्रसाठी पैलवान मारुती बेन्नाळकर यांनी मुंबई पोलिसांना उघड आव्हान देत छातीवर गोळी झेलली आणि हौतात्म्य पत्करले. ज्या बेळगाव ने संयुक्त महाराष्ट्रसाठी ५ जणांचे आयुष्य दिले आज तोच बेळगाव आणि सोबतचा ४० लाख लोकांचा सीमाभाग महाराष्ट्रपासून वंचित राहिला . आजही हा सीमाभाग महाराष्ट्रामध्ये सामिल होण्यासाठी लढत आहे. गेली ६० वर्षे हुतात्म्यांचे स्मरण करत लढ़ा चालू आहे व १७ जानेवारी हा दिवस गांभीर्याने पाळला जातो. महाराष्ट्राने सुद्धा या दिवशी हरताळ पाळत हुतात्म्यांना अभिवादन करत हा लढ़ा मजबूत करावा अशी इच्छा आजच्या बैठकीत मांडण्यात आली.सभेच्या अध्यक्षस्थानी दिपक दळवी होते. रणजीत पाटिल यांनी स्वागत केले सर्वांचे . तसेच या वेळी कवी मंगेश पाडगांवकर व् समिति नेते वाय.एस पिंगट यांना श्रद्धांजलि वाहिली. तसेच चंद्रकांत दादा पाटिल यांची समन्वय मंत्री म्हणून नियुक्ती केली या बद्दल त्याचे स्वागत करत महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी अनेकांनी आपले विचार मांडले . या दिवशी हुतात्मा चौक बेळगाव येथे सकाळी ९ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात हजारोंनी सहभागी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. बेळगाव बिलोंग्स टू महाराष्ट्र या फेरीत पूर्ण ताकदिनीशि सहभागी होईल व् जास्तीत जास्त तरुण या लढ्यात सहभागी होतील यासाठी प्रयत्नशील असेल. (पियुष हावळ:- बेळगाव)]]>