नवी दिल्ली: भाजपच्या मोदी सरकारनं भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी भारतीय चलनातून पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा ऐतिहासिक व महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आज रात्री (दिनांक ८ नोव्हेंबर, २०१६) मध्यरात्रीपासून या नोटा केवळ कागदाचा तुकडा म्हणून राहतील. या निर्णयामुळे भारतात असलेल्या काळ्या पैश्याला आळा बसेल व भारतीय अर्थव्यवस्थेत मोठी सुधारणा होईल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. तसेच नागरिकांनी घाबरून न जाण्य्याचाही सल्ला त्यांनी दिला. ज्यांच्याकडे ५०० व १००० च्या नोटा आहेत त्यांना १० नोव्हेंबर ते ३० डिसेंबर पर्यंत बँका व पोस्ट ऑफिस मध्ये नोटा बदली करून मिळतील. पाहूया या निर्णयातील काही महत्वाचे मुद्दे
- १० ते २४ नोव्हेंबर केवळ ४ हजार रुपये बॅंकेतून किंवा एटीएममधून काढता येणार
- १५ दिवसांनंतर याची मुदत वाढ होईल
- ३० डिसेंबर २०१६ पर्यंत नोटा बदलून मिळणार आहेत.
- ३१ डिसेंबरनंतर थेट रिर्झव्ह बॅंकेत नोटा बदलाव्या लागतील.
- उद्या बॅंका बंद, एटीएम ९ नोव्हेंबर आणि १० नोव्हेंबर या दोन दिवशी बंद राहणार
- बॅंकेत पैसे जमा करताना तुमच्याकडे पॅन नंबर, मतदान कार्ड किंवा आधार कार्ड बंधनकारक असणार आहे