नवी दिल्ली: २०१४ च्या सत्तांतरानंतरदेशभरात चालू झालेली मोदीलाट आज काहीश्या प्रमाणात शमलेली दिसली. पाच राज्यांच्या विधानसभानिवडणुकीत काँग्रेसने भाजपवर सरशी दाखवत सत्ता आपल्या हाती घेतल्याचं चित्र दिसून आलं.राजस्थान व छत्तीसगढ येथे स्पष्ट बहुमत तर मध्य प्रदेशमध्ये भाजपपेक्षा एक जागा जास्तजिंकत बऱ्याच दिवसानंतर काँग्रेसच्या गोठात उत्साहाचं वातावरण दिसून आलं. दुसरीकडेभाजपला या पाचही राज्यांच्या जनतेने नाकारत एक प्रकारे मोठी चपराकच लावली असे म्हणावंलागेल. आगामी २०१८ च्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा हा मोठाविजय मनाला जातोय.
राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत कॉग्रेसला म्हणावं तसं यश अद्यापही मिळालं नव्हतं. केवळ पंजाबचा अपवाद वगळता काँग्रेसला स्वबळावर एकही राज्यात सत्ता मिळाली नव्हती. त्या अनुषंगाने या पाच राज्यांच्या निवडणूक काँग्रेससोबतच राहुल गांधींसाठीही अस्तित्वाची लढाई होती. पण आजच्या निकालानंतर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली तर राजस्थानात तब्बल चौपट जागा पटकावल्या.
राजस्थानमधली सत्ताबदलाची परंपरा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधली प्रस्थापितविरोधी लाट याचा वाटा काँग्रेसच्या यशामध्ये असला तरी राहुल गांधींची संघटनाबांधणी आणि सर्वसमावेशकतेचं राजकारणही यानिमित्तानं अधोरेखित झालं. तेलंगणामध्ये तेलुगू देसम पक्षाबरोबच्या युतीचा काँग्रेसचा अंदाज चुकला आणि ईशान्येकडचं शेवटचं राज्य मिझोराम काँग्रेसनं गमावलं. पण तीन महत्त्वाच्या राज्यांमध्ये सत्ता स्थापन करण्याची संधी काँग्रेसला मिळाली आहे.
महाराष्ट्रातही या निकालांचे स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र काँग्रेसमध्येही जोशात या निकालांचे स्वागत करण्यात आलं. नाशिकमध्येही काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला. नाशिकच्या एमजी रोडमधील काँग्रेस कार्यालयाबाहेर पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. तसेच मुंबईतही काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहेत. एकमेकांचे पेढे भरवून पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
]]>