पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ जाहीररीत्या हिंदुसभेने केला पाकिस्तानचा ध्वज जाळून निषेध

मुंबई: काश्मीरमध्ये पुलवामा येथे सीआरपीएफ च्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात ४४ भारतीय सैनिक हुतात्मा झाले. या हल्ल्याच्या निषेधार्थ अखिल भारत हिंदू महासभेने धारावी येथे जाहीररीत्या निषेध करून पाकिस्तानचे ध्वज जाळण्यात आले.

यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय, वंदे मातरम्, अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच जाहीर निषेध व्यक्त केल्यानंतर हुतात्मा झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली.

या प्रसंगी मुंबई हिंदू महासभेचे सहकार्यवाह श्री. गणेश कदम, कार्यालयीन कार्यवाह श्री. रमेश कराळे, संघटक श्री. प्रवीण गर्जे यांच्यासह धारावीतील पदाधिकारी श्री. अक्षय इंगळे, श्री. रोनक हलवाई, सौ. निलम कराळे, सौ. अंजली काशीद, श्री. संजय कराळे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *