पुण्यक्षेत्र सावरकर सदनात दिपावलीची भेट

मुंबई:- राष्ट्राभिमानी समिती व ज्ञानदा प्रबोधन संस्थेतर्फे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही मुंबईतील दादर मधील शिवाजी पार्क जवळील स्वातंत्र्यवीर सावरकर सदनात जाऊन सावरकर यांच्या स्नुषा आदरणीय सुंदर वहिनी यांचे आशीर्वाद घेऊन त्यांना दीपावलीचा फराळ भेट देण्यात आला. तसेच काही कंदील घेऊन  ते सावरकर सदनाला लावले. वास्तविक अशा पुण्य स्थळाला लोक प्रतिनिधी, शासनाने सजवायला हवे होते पण ते दुर्लक्षित ठेवणे हेच दुर्भाग्य आहे देशाचे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भलेही राज्यकर्त्यांना किंवा लोक प्रतिनिधींना विसर पडला, तरी त्यांचे असंख्य भक्त आहेत जे त्यांच्यावर स्वतःच्या जिवापेक्षाही जास्त प्रेम करतात. आज ही सेवा आम्हांला करायला मिळते आहे हे आमचे भाग्यच आहे असेच आम्ही म्हणू असे समितीचे व संस्थेचे अध्यक्ष प्रशांत जनार्दन पळ म्हणाले. सदर भेटी दरम्यान विलास काका ह्यांनी पुढाकार घेऊन ही भेट घेतली.
]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *