मतदान केंद्रांवर मोबाईल घेऊन जाणार्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. केवळ मोबाईलच नव्हे तर मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. राज्यातील दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात झालेल्या प्रकरणांमुळे गुप्त मतदान या संकल्पनेला गालबोट लागलं आहे. परिणामी, निवडणूक अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचं समजत आहे.
२०१९ लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (२९ एप्रिल) रोजी चौथ्या व शेवटच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. मतदार दात्याला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक यंत्रणेने जय्यत तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये राज्यातील १७ मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. ३ कोटी ११ लाख ९२ हजार ८२३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यात १ कोटी ६६ लाख ३१ हजार पुरुष तर १ कोटी ४५ लाख ५९ हजार महिला मतदार आहेत. नंदुरबार (अ.ज.), धुळे, दिंडोरी (अ.ज.),नाशिक, पालघर (अ.ज.), भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण,मावळ, शिरुर आणि शिर्डी (अ.जा.) या लोकसभा मतदारसंघत मतदान होणार आहे.
]]>