नवी मुंबई, १ नोव्हेंबर (वार्ता.) – नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने महानगरपालिका क्षेत्रातील २४ धार्मिक स्थळांना अनधिकृत ठरवून त्यांच्यावर कारवाईची नोटीस दिली आहे. महानगरपालिकेने अनधिकृत ठरवलेल्या बांधकामामध्ये एक मशीद आणि एका दर्गा यांचा समावेश आहे. असे असतांना अतिक्रमण विभागाने केवळ मंदिरांवरच कारवाई चालू केली आहे. आतापर्यंत येथील ३-४ मंदिरे पाडण्यात आली आहेत. दुसरीकडे अनधिकृत मशीद आणि दर्गा यांविरोधात मात्र कारवाई करण्यात आलेली नाही. याउलट मशीद आणि दर्गा अधिकृत करता येतील, असा शेरा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मंदिर पाडण्याविषयी खडसवणाऱ्या भाविकांना मात्र येथील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने “आम्हाला कायदा शिकवू नका”, असे उद्दामपणे उत्तर दिले. (हे पोलीस भारताचे कि पाकचे ? सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांनी एकातरी मशिदीवर कारवाई केली आहे का ? कारवाई विषयी दुजाभाव करणारे पोलीस कायदा-सुव्यवस्था काय राखणार ? ही स्थिती पालटण्यासाठी व्यापक हिंदूसंघटनाला पर्याय नाही ! – संपादक) त्यामुळे आता एक लढा देवासाठी हे धोरण ठरवून सर्व ग्रामस्थ आणि भाविक मंदिरांच्या रक्षणासाठी सिद्ध झाले आहेत. (मंदिरांच्या रक्षणासाठी संघटित होणाऱ्या ग्रामस्थांचे अभिनंदन ! – संपादक) ग्रामस्थांच्या या लढ्याला येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पाठिंबा घोषित केला आहे. ( साभार:- दैनिक सनातन प्रभात)]]>