सपा नेते अबू आझमीने नुकत्याच केलेल्या विधानाने एकच खळबळ उडवली आहे. कोणताही सच्चा मुसलमान ‘वंदे मातरम्’ गाणार नाही असे बोलत एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. मुंबई: एकीकडे ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या सक्तीच्या मागणीवरून मोठा वाद होण्याची चिन्हे दिसतात, तर दुसरीकडे समाजवादी पक्षाचे वादग्रस्त आमदार अबू आझमीने “कोणताही सच्चा मुस्लिम वंदे मातरम् गाणार नाही” असे विधान करीत नव्या वादाला सुरुवात केली आहे. अबू आझमीने म्हटले आहे की, “आम्हाला देशातून बाहेर काढा, पण खरा मुसलमान कधीच वंदे मातरम् गाणार नाही”. मी ‘वंदे मातरम्’चा सन्मान करतो, मात्र माझा धर्म मला वंदे मातरम् म्हणण्याची परवाणगी देत नाही. मग कारवाई करा, किंवा जेलमध्ये टाका”. त्यांच्या या वादात आता सत्ताधारी शिवसेनेनेही उडी घेत वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहे. एम. आय. एम. चे भायखळा येथील आमदार वारीस पठाण यांनी “कोणतीही विचारधारा कोणावर सोपवू शकत नाही. मी वंदे मातरम् म्हणणार नाही. माझा धर्म, कायदा आणि संविधान मला याची परवानगी देत नाही. माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी बोलणार नाही. विधानसभेत हा मुद्दा उचलून धरला तरी विरोध करेन” असे विधान केले होते. याला प्रतिउत्तर देताना शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी “गळ्यावर सुरी ठेवण्याचा प्रश्नच नाही. मात्र इतकीच लाज वाटत असेल, तर स्वतः चालते व्हा. ही आमची मातृभूमी आहे. या भूमीला स्वतंत्र करणारं हे गीत आहे. त्या गीताचा आदर करण्याचा जर त्रास होत असेल, तर इथून निघून जा. ह्यांना पाकिस्तानची आठवण का येते? बांग्लादेशची आठवण का होत नाही? हे राहतात इथे, मात्र मनाने पाकिस्तानी आहेत”. अश्या शब्दात आपला राग व्यक्त करीत तिखट प्रतिक्रिया दिली. भाजप आमदार राज पुरोहित यांनी शाळा-कॉलेज, सरकारी कार्यालयांमध्येही वंदे मातरम् गीताची सक्ती करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार असल्याचे सांगितले आहे. गरज पडल्यास सभागृहात आवाजही उठवू असेही ते म्हणाले.]]>