पिडीत कुटुंबाला विक्रोळी मधील श्री शिवकार्य प्रतिष्ठानने केले सहाय्य ! मुंबई– बिल्लू मेहेरसिंग वाल्मीकी आणि संगीता बिल्लू वाल्मीकी हे दाम्पत्य २००१ पासून विक्रोळी, कन्नमवर नगर १, प्रगती हायस्कूल जवळील झोपडपट्टीत राहतात. हा भाग हिंदुबहुल असून येथे केवळ ७ ते ८ झोपड्या मुसलमानांच्या आहेत. हे दाम्पत्य वाल्मीकी समाजातील असल्यामुळे धार्मिक विधींसाठी त्यांनी आपल्या घराजवळ डुक्कर कापले. याचा तेथील मुसलमानांनी विरोध केला. वाल्मीकी दाम्पत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. या घटनेपश्चात ७ ते ८ महिन्यानंतर त्या मुसलमानांनी वाल्मीकींच्या घरावर दगडफेक केली. हा दगडफेकीचा प्रकार त्यानंतर ४ ते ५ वेळा घडला. त्या त्रासाने वाल्मीकी कुटुंब काही काळासाठी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाले. काही महिन्यांनी ते कुटुंब पुन्हा वस्तीत राहण्यासाठी आले, तेव्हा ते परत आलेले समजताच त्या मुसलमानांनी २०१५ च्या दिवाळीत वाल्मीकी कुटुंबाच्या घराची जाळपोळ केली. जाळपोळीचे ३ ते ४ वेळा प्रयत्न करण्यात आले. त्यात त्यांच्या घराची हानी झाली आहे. ‘जेबून फकरू शेख’ आणि ‘सलमा शेख’ या मुसलमान महिलांना जाळपोळ करताना त्याच वस्तीत राहणाऱ्या एका (वय वर्ष ९) मुलीने घटनास्थळी पहिले आहे. घडलेल्या प्रकारची तक्रार करण्यासाठी वाल्मीकी दांपत्य पोलिस स्टेशनला गेले आणि तक्रार नोंदवली. (पोलिसांनी नेहमीप्रमाणे हिंदूंच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून काहीही कारवाई केली नाही). तक्रार केल्याची कळताच त्या मुसलमानांतील ‘जेबून फकरू शेख’ या महिलेने “तक्रार मागे घ्या नाहीतर तुमच्या मुलाला गायब करू “अशी धमकीदेखील दिली. पोलिसांकडून मदत मिळत नसल्याची लक्षात येताच वाल्मीकी दाम्पत्यांनी स्थानिक ‘श्री शिवकार्य प्रतिष्ठान’शी संपर्क केला आणि घडलेला प्रकार सांगितला, घटनेची गंभीरता लक्षात घेऊन ‘श्री शिवकार्य प्रतिष्ठान’ आणि विक्रोळी मधील स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येउन ३१ जानेवारी २०१६ रोजी सकाळी ११ वाजता तेथील स्लम कमिटीशी चर्चा केली तसेच त्रास देणाऱ्या मुसलमानांना धमकावले. परिणामी तेथील ‘स्लम कमिटीने’ पिडीत वाल्मीकी कुटुंबाला राहण्यासाठी नवीन जागेची व्यवस्था करून दिली आणि जाळपोळ झालेले घर ताब्यात घेतले जेणेकरून पुढे तिथे अतिक्रमण होणार नाही. सतर्कतेने आणि तत्परतेने हिंदुंवरील आघातांवर कृती करणाऱ्या श्री शिवकार्य प्रतिष्ठानचे अभिनंदन! (श्री. दिनेश कर्णिक:- युवा सह्याद्री, घाटकोपर, मुंबई)]]>