हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवा साजरा करण्यासाठी धारावी येथे संत रोहिदास मार्गावर प्रथमच भगवी गुढी उभारून नवीन वर्षाच्या स्वागताचा कार्यक्रम अखिल भारत हिंदू महासभा यांच्या वतीने साजरा करण्यात आला.
हिंदू संघटक, समाजसुधारक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी, गुढी कशी असावी आणि गुढीपाडवा का साजरा करावा, हा संदेश देणारा फलक कार्यक्रमस्थळी लावण्यात आला.
गुढीपाडवा सणासंदर्भात होत असलेला अपप्रचार थांबून, हिंदूंनी एकत्र येऊन भगवी पताका उभारून गुढीपाडवा साजरा करावा. असा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवा निमित्ताने काढलेल्या शोभायात्रेतील हिंदू बांधवांना अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने संत कक्कया मार्गावर, लाडू आणि पाणी वाटप करण्यात आले.
अखिल भारत हिंदू महासभेचे धारावी अध्यक्ष कु. गणेशजी कदम, प्रमुख कार्यवाह श्री. रमेशजी कराळे, कार्यकर्ते कु. प्रशांत केणी, कु. अक्षय इंगळे, कु. आकाश सोनवणे, कु, प्रतीक राजहंस, कु. क्रांतीकृष्ण, कु. अरुण साळूंखे, कु. राजू जतन, श्री. राजू कराळे, श्री. संजय कराळे, महिला कार्यकर्ते, वज्र दल संघटनेचे कार्यकर्ते आणि ज्येष्ठ समाजसेवक श्री. राजेंद्रजी खंदारे कार्यक्रमाला उपस्थित होते.
सदर कार्यक्रम आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला.
]]>