मुंबई – केंद्रीय अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नंदकुमार नायर यांच्याकडून सनातनचे साधक श्री. हेमंत शिंदे, नीलेश शिंदे, नीरज येनगूल, महेंद्र सहस्रबुद्धे, यशवंत सहस्रबुद्धे, गजानन केसकर, कृष्णा कुंभार इत्यादी निरपराधांना अंनिसचे डॉ. दाभोलकर खून प्रकरणात गोवण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला जात आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे. मालेगाव २००६ आणि मालेगाव २००८ बाँबस्फोट प्रकरणांत झाले, तसे या प्रकरणात निरपराध्यांचे गळे अडकवून स्वत: सहीसलामत सुटून जाणे हे भ्रष्ट पोलीस अधिकारयांना शक्य होऊ नये, यासाठी पोलीस अधीक्षक नंदकुमार नायर यांच्या वर्तनाविषयी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. तोपर्यंत त्यांना निलंबित करावे, तसेच त्यांचे भूतकाळातील वर्तन तपासून त्यांना सेवामुक्त करावे आणि त्यांना तुरुंगात पाठवावे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी केले. या पत्रकार परिषदेस हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर उपस्थित होते. सी.बी.आय.चा मोबाईल क्रमांकाच्या रोमिंगवर आधारलेला पुृढे दिलेला तपास एकांगी आणि खोट्या सिद्धांतावर आधारित ! सी.बी.आय. संपूर्ण तपास मोबाईल क्रमांकाच्या रोिंमगवरच आधारित करत आहे. निरज येनगूल, कृष्णा कुुंभार आणि नीलेश शिंदे यांचे मोबाईल क्रमांक डॉ. दाभोलकर यांचा खून झाला, त्या दिवशी त्याच परिसरात सकाळी रोम झाले होते, असे सी.बी.आय.चे म्हणणे आहे. श्री. गजानन केसकर यांचा मोबाईल क्रमांक रात्री डॉ. दाभोलकर उतरले, त्या बसस्टँडवर रोम झाला होता. डॉ. दाभोलकर यांच्या खुनाच्या ठिकाणाहून जवळच दोन महिन्यांपूर्वी हेमंत शिंदे रहायला आले होते. या सर्वच व्यक्तींचे मोबाईल क्रमांक एकमेकांच्या संपर्कात होते. हे क्रमांक सामायिक ठिकाणी एकत्र आल्यामुळे त्यांच्या बैठका होत असणार. अशी बैठक या सर्वांची खुनाच्या आदल्या दिवशी संध्याकाळीही झाली होती. हे सर्वजण सनातनचे साधक आहेत. मिरज दंगलीत आरोपी असणारा (याची पुढे निर्दोष सुटका झाली होती.) महेंद्र सहस्रबुद्धे हा देखील यांच्या संपर्कात होता आणि वडिलांचा मोबाईल वापरत होता. वरील व्यक्तींचा रोमिंग पॅटर्न चुकीच्या पद्धतीने मांडला जात आहे. सनातन प्रभात दैनिकांचे वितरण करण्यासाठी यातील काही साधक पहाटे त्या भागात जातात. श्री. केसकर हे रात्री स्टँडवरून दैनिकांचे गठ्ठे वितरण करण्याचे काम पहात होते. एक साधक पहाटे व्यायामशाळेत जातो. या सर्वांचे रोमिंग खुनाच्या कित्येक महिने आधीपासून आणि खुनानंतर कित्येक महिनेपर्यंत त्याच भागात आणि त्याच वेळी सातत्याने होत आहे. ही बाब तपासून पहावी आणि रेकॉर्डला घ्यावी, या सनातन संस्थेने कळवळून केलेल्या विनंतीकडे सीबीआयचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नायर दुर्लक्ष करीत आहेत. त्याऐवजी खुनाच्याच दिवशीचे रोमींग रेकॉर्ड उच्च न्यायालयापुढे मांडून त्यांनाच खुनी म्हणून दाखवून एकदाची उच्च न्यायालयाच्या ससेमिरयापासून मुक्तता करून घ्यायची, असा नायर यांचा डाव आहे. परंतू या साधकांचा दिनक्रम सातत्य दर्शवतो. त्यांच्यातील तथाकथित बैठका खुनाच्या आदल्या दिवशीच नव्हे, तर त्यापूर्वी कित्येक महिने अगोदरपासून आणि त्यानंतरही कित्येक महिन्यांपर्यंत होत असल्याचे न्यायालयापासून लपवण्याचा प्रयत्न अतिरिक्त पोलीस अधीक्षक नायर करीत आहेत. थोडक्यात तपास झालेल्या व्यक्तींचे संशयास्पद रोमिंग झाल्याचा खोटा सिद्धांत अतिरिक्त पोलीस अधीक्षक नायर मांडत आहेत. त्या विशिष्ट दिवशी डॉ. दाभोलकरांचा त्या परिसरात खून होणे आणि या साधकांचे रोमिंग हा योगायोग आहे, ही गोष्ट या साधकांचे संपूर्ण रोमिंग रेकॉर्ड तपासल्यास सहज सिद्ध होते. त्यामुळे खुनाच्या किंवा आदल्या दिवशीच नव्हे तर एरवीही साधक एकमेकांच्या संपर्कात असतात, हेही दिसून येते. तरीही संपूर्ण रोमिंग रेकॉर्ड न मागवण्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नायर यांनी ठरवून टाकले आहे. याच भागात अन्य वृत्तपत्र विक्रेत्यांचेही रोमिंग हात असतांना केवळ सनातन प्रभातशी संबंधीत व्यक्तींनाच तपासाला रात्री आणि सकाळी बोलवले जात आहे. उच्च न्यायालयाला दोन संशयितांची नावे बंद लिफाफ्यात देऊन कळवतांना संशयित व्यक्ती त्याच संघटनेच्या आहेत, या सी.बी.आय.च्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयापुढे केलेल्या विधानाचे रहस्य लक्षात आल्यामुळे वरील निरपराध साधकांना अटक करून स्वत:ची कातडी नायर वाचवणार आहेत, अशी भीती आता वाटू लागली आहे. डॉ. दाभोलकर प्रकरणातील अन्य महत्त्वाच्या पुराव्यांकडे दुर्लक्ष ! केतन तिरोडकर या प्रकरणातील याचिकादार असूनही त्यांच्या फेसबूकवर त्यांनी केलेल्या गंभीर आरोपांचा कोणताही तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक नायर यांनी केलेला नाही. या आरोपांचे गांभीर्य दाखवणारी एक पोस्ट खाली देत आहे. पुण्यातील एक सोनार पेढी, नागपुरातील एक रा.स्व.संघ कार्यकर्ता आणि मध्यप्रदेशातील शस्त्रविक्रेता यांचा दाभोलकर-पानसरे हत्येत हात आहे. तिरोडकरांचे शब्द स्पष्ट आहेत. एखाद्या फौजदारालाही त्याचे गांभीर्य समजून तिरोडकरांशी संपर्क करावासा वाटला असता; पण नायर यांना त्याची आवश्यकता वाटली नाही. या प्रकरणी हिंदू विधीज्ञ परिषदेने लिहिलेली दिनांक १६.०७.२०१४ आणि ०३.११.२०१५ पत्रे मिळालीच नाहीत, असे खोटे सांगून या पत्रांतील महत्त्वाचे दुवे दडपून टाकण्याचा प्रयत्न अतिरिक्त पोलीस अधीक्षक नायर करीत आहेत. हिंदू विधीज्ञ परिषदेचे कार्यकर्ता श्री. विक्रम भावे यांनी पोलीस अधिकारयांची या प्रकरणातील संशयास्पद भूमिका दाखवणारे २४ पानांचे पत्र लिहिले होते. त्यावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक नायर यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. तपास हाती आल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांकडून कोणतीही कागदपत्रेच त्यांनी घेतली नाहीत. सीबीआयचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक नायर यांची कार्यपद्धती आक्षेपार्ह ! नायर यांची तिरुवनंतपूरहून मुंबईला बदली झाली होती, ती केरळ उच्च न्यायालयाने त्यांच्यावर मारलेल्या ताशेरयांमुळे. पोलीस कोठडीत एक कैदी मरण पावल्यामुळे त्याचा तपास एका सीपबीआय अधिकारयाकडे दिला. त्या तपासातील ताणामुळे हरीदत्त नावाच्या त्या अधिकारयानेही आत्महत्या केली. पुन्हा त्याचा तपास चालु झाला. या प्रकरणामध्ये ठपका ठेवण्यात आलेल्या सीबीआयच्या दोन अधिकारयांनी (उन्नीकृष्णन नायर आणि राजन) केरळ उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय गाठले. तेथे त्यांना निर्दोष ठरवण्यात आले. केरळ उच्च न्यायालयाने या प्रकरणात याच नायर यांच्यावर मारलेले ताशेरे अत्यंत गंभीर आहेत. जे खालीलप्रमाणे… अ. वरिष्ठ अधिकारयांना वाचविण्यासाठी नंदकुमार नायर यांनी उन्नीकृष्णन आणि राजन या दोघांना एका पाठोपाठ एक मेमो दिले. त्यांचे रेकॉर्ड खराब केले. आ. नंदकुमार नायर यांच्यासारख्या अधिकारयाकडे तपासाची सूत्रे असणे ही सी.बी.आय.साठी शरमेची बाब आहे.इ. अशा अधिकारयालाच सुधारण्याची आणि शिस्त लावण्याची गरज आहे. ई. मोहम्मद यासीन या वरीष्ठ अधिकारयाला वाचविण्याचा प्रयत्न नायर यांनी केला, हे स्पष्ट दिसून येते. वरिष्ठ अधिकारी गुंतत आहेत, हे पाहून संतापलेले नंदकुमार नायर या दोन निरपराध अधिकारयांच्या मागे लागले हे देखील स्पष्ट दिसून येते. २७.०७.२०१३ रोजी एर्नाकुलम येथील न्यायालयाने एका अनैर्सिगक मृत्यु प्रकरणात नायर यांनी दाखल केलेले आरोपपत्र फेटाळून लावतांना नायर यांना कपोलकल्पित कहाण्या रचण्याची सवय आहे, असे म्हटले होते. आज याच अतिरिक्त पोलीस अधीक्षक नंदकुमार नायर यांच्या हाती डॉ. दाभोलकर हत्येच्या तपासाची सूत्रे आहेत. पोलीस अधीक्षक नायर यांची श्री. अभय वर्तक यांना अपमानास्पद वागणूक ! १३.११.२०१५ रोजी श्री. अभय वर्तक यांचा जबाब घेण्यासाठी त्यांना सी.बी.आय.च्या कार्यालयात बोलावून अतिरिक्त पोलीस अधीक्षक नायर त्यांच्याशी अत्यंत अपमानास्पद वागले. ६ तास त्यांनी वर्तक यांना बसवून ठेवले. त्यानंतर अभय वर्तक यांना सिगारेट ओढता का ? नाही ? मग निदान दारू तरी रोजच पित असाल ?, यांसारखे अपमानास्पद प्रश्नही विचारले. श्री. वर्तक यांना एखाद्या गुन्हेगार अथवा दहशतवाद्यासारखे वागवून नायर यांनी स्वत: त्यांची बॅग तपासली. सनातन संस्थेविषयी ते तुच्छतेने बोलले. त्यावरून अशी खात्री पटते की, ते पूर्वग्रहाच्या आहारी गेले असून सनातन संस्थेला बळीचा बकरा बनवत आहेत. पोलीस अधीक्षक नंदकुमार नायर यांना सेवामुक्त करा ! कोल्हापूर येथील न्यायालयापुढे आपण म्हणू ती नावे घेतल्यास २५ लाख रुपये देण्याचे आमीष पोलिसांची दाखवल्याची तक्रार सनातनचे साधक समीर गायकवाड यांनी केल्यानंतर डॉ. दाभोळकर प्रकरणात मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांनी याच स्वरूपाचे आरोप केले होते, याची आठवण होते. हे साम्य असूनही काहीही तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक नायर यांनी केला नाही आणि डॉ. दाभोळकर कुटुंबियांनीही तोंड उघडले नाही. यावरून असे दिसून येते की, समाजात निर्माण झालेल्या सहानुभूतीचा गैरफायदा घेऊन दाभोळकर परिवार आणि तथाकथित सामाजिक संस्था पोलिसांवर दबाव आणत आहेत. ज्यांनी समीरला पैसे देऊ केले, ज्यांनी नागोरी-खंडेलवालला पैसे देऊ केले, त्यांनी पोलीस अधीक्षक नायर यांना निश्चित पैसे दिलेले आहेत, असा संशय येतो. जी माहिती पोलीस अधीक्षक नायर यांच्याविषयी सनातन संस्थेकडे आहे, ती दाभोळकर कुटुंबीय, सामाजिक संस्था, विचारवंत, यांच्याकडे नाही का ? तरीही त्यांनी पोलीस अधीक्षक नायर यांच्याबद्दल काहीही आवाज उठवलेला नाही. उलट पोलीस अधीक्षक नायर यांचा उपयोग करून निरपराध्यांना गुंतवता येते, याविषयी ते समाधानी दिसून येतात. दाभोळकर -पानसरे यांच्या कार्यकत्र्यांनी पुणे-कोल्हापुर लाँग मार्च काढला. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आणि संभाजी ब्रिगेडचा समर्थक असणारया संग्राम साळोखे याने यावेळी आपल्या भाषणात सनातन प्रभातचे वाटप करणारया कार्यकर्त्यांनीच या हत्या केल्या असा जाहिर आरोप केला. यावरून नायर यांना कोणी विकत घेतले आहे आणि कोणाच्या सुचनेप्रमाणे हा सर्व तपास चालला आहे हे सिद्धच झाले आहे. एकूणच या प्रकरणी पोलीस अधीक्षक नंदकुमार नायर यांच्या वर्तनाविषयी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. तोपर्यंत त्यांना निलंबित करावे, तसेच त्यांचे भूतकाळातील वर्तन तपासून त्यांना सेवामुक्त करावे आणि त्यांना तुरुंगात पाठवावे, अशी मागणी आम्ही सी.बी.आयचे दिल्ली कार्यालय आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. आपला नम्र, श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था, संपर्क : ७७७५८५८३८७]]>