नवी मुंबई / सूर्यकांत गोडसे: नेरुळ सेक्टर-२ येथील संभाजी महाराज उद्यान व सेक्टर-४ येथील सेनापती नेताजी पालकर मैदान अश्या दोन्ही ठिकाणी ‘ओपन जिम’ आमदार निधीतून उभारण्यात यावी, अशी मागणी भाजपा युवती मोर्चा जिल्हाप्रमुख सुहासिनी नायडू यांनी लेखी निवेदनाच्या माध्यमातून स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे यांसकडे केली आहे. नेरुळ सेक्टर-२ व व सेक्टर-४ च्या सभोवताल भागात वास्तव्य करणारे रहिवाशी, ज्येष्ठ नागरिक व युवक-युवती यांसाठी शारीरिक स्वास्थ्य सुयोग्य ठेवण्यासाठी आवश्यक असणारे दैनंदिन व्यायाम करण्यासाठी कोणतीच सुविधा उपलब्ध नाही. ही बाब लक्षात घेता, नेरुळ सेक्टर-२ येथील ‘संभाजी महाराज’ उद्यानात व सेक्टर-४ येथील सेनापती नेताजी पालकर मैदानात जर आमदार निधीतून ‘ओपन जिम’ उभारण्याची संकल्पना राबविली. तर, उद्यान व मैदानाच्या सभोवताल परिसरात वास्तव्य करणाऱ्या सर्वच वयोगटातील नागरिकांना त्याचा आरोग्य सुव्यवस्थित ठेवण्यास सहकार्य प्राप्त होईल. असा, विनंती उल्लेख सुहासिनी नायडू यांनी आमदारांना दिलेल्या मागणी पत्रात केला आहे. निवेदन देतेवेळी भाजपा पदधिकारी सुवर्णा होस्मानी, रीना सिंघ,अनिता कारकाला, सुषमा कोडग, पूनम साळुंके, रुबी नायर, प्रतिभा मांजरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.]]>