मुंबई :- दिनांक ८/९/२०१८ या दिवशी केंद्रीय अन्वेषण विभागाचे अधीक्षक एस.आर. सिंह हे डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याला तपासासाठी पुण्यात घेऊन आले होते. त्यामुळे केंद्रीय अन्वेषण विभागाच्या बेलापूर, नवी मुंबई येथील कार्यालयाने एस.आर. सिंह अनुपस्थित आहेत, म्हणून तेथे ठेवण्यात आलेल्या अन्य आरोपींना वकीलांना भेटू दिले नाही. त्यानंतर आम्ही दिनांक ९/९/२०१८ या दिवशी या आरोपींची भेट घेतली; त्या वेळी आम्हाला अत्यंत धक्कादायक माहिती मिळाली. ती अशी, १.) श्री. राजेश बंगेरा आणि श्री. अमोल काळे यांना कोल्हापूर तपास पथकातील पोलीस अधीक्षक दर्जाच्या एका अधिकार्याने बेलापूर येथील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या कार्यालयात घुसून अमानुष मारहाण केली आणि कॉ. पानसरे प्रकरणातील सहभागाची कबुली न दिल्यास यापेक्षा गंभीर छळाला तोंड द्यावे लागेल, आम्ही तुमचा लवकरच ताबा घेऊ, अशी धमकीही दिली. कॉ. पानसरे हत्या प्रकरणी न्यायालयाकडून अधिकृतपणे कोठडी घेतलेली नसतांना अशी बेकायदेशीरपणे मारहाण कोल्हापूर तपास पथकातील पोलीस अधिकार्यांनी केली, हे अत्यंत गंभीर आहे. २.) दिनांक १०/९/२०१८ या दिवशी सध्या न्यायालयीन कोठडीत असणारे श्री. सचिन अंदुरे यांची वकिलांनी भेट घेतली असता महाराष्ट्र शासनाच्या याच अधिकार्याने नंदकुमार नायर यांच्या उपस्थितीत अत्यंत हिंस्रपणे श्री. सचिन अंदुरे यांना मारहाण केली होती असे समजले. ३.) नंदकुमार नायर या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पश्चिम भारत शाखेचे प्रमुखपद भुषविणार्या अधिकार्याने देखील सचिन यांना मारहाण केली आणि अमोल काळे आणि डॉ. वीरेंद्र तावडे यांनी तुझ्या बायकोचा उपभोग घेतल्याचे कबूल केले आहे, अशा आशयाची अत्यंत गलीच्छ भाषा वापरली. ४.) नंदकुमार नायर यांनी तुझा बचाव करणार्या वकीलांचेच नाव खुनाचा सूत्रधार म्हणून सांगून टाक, असे म्हणत सचिन अंदुरे यांच्यावर प्रचंड दबाव आणला. तुझ्या बायकोवर बलात्कार करीन, अशी धमकीही नायर यांनी दिली. ५.) आता कबुली दिली नाहीस, तर कोल्हापूर पोलिसांच्या कोठडीत गेल्यावर तुला कल्पनाही येणार नाही, असा तुझा छळ करू, अशीही धमकी नंदकुमार नायर आणि महाराष्ट्र पोलीस दलातील हिरवट निळे डोळे असणार्या अधीक्षक दर्जाच्या अधिकार्याने सचिन अंदुरे यांना दिली. ६.) सर्वांत खेदाची बाब अशी की, हे दोन्ही अधिकारी आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आमच्या खिशात आहेत, अशी आक्षेपार्ह भाषा वापरत होते. याविषयी तक्रार करणारे पत्र सदर आरोपींचे प्रतिनिधीत्व करणार्या वकीलांच्या संघटनेने म्हणजे हिंदु विधीज्ञ परिषदेने आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रस्तुत केले. सदर तक्रारीच्या संदर्भात आरोपींच्या जोडीनेच संबंधित पोलीस अधिकार्यांची नार्को चाचणी करावी आणि प्रसंग पडल्यास आरोपींच्या वकीलांचीही नार्को चाचणी करावी, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केली. तसेच जनतेचा पैसा खाऊन हिंदूंविषयी द्वेष पसरवणे, हिंदूंवर अत्याचार करणे आणि हिंदुत्वासाठी काम करणार्या निष्पाप हिंदु युवकांना नाहक छळणे, असे कार्य हिंदुद्वेषी विचारसरणी बाळगणारे अधिकारी सत्ताधारी पक्षाच्या आड दडून कसे करत आहेत, हेही जनतेसमोर येईल, असेही अधिवक्ता पुनाळेकर या वेळी म्हणाले. या पत्रकार परिषदेला हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता धर्मराज चंदेल हे देखील उपस्थित होते. सत्यमेव जयते । , हे हिंदूंचे ब्रीद आहे. दुर्दैवाने विद्यमान राज्यकर्ते सत्याचा शोध हिंदु धर्मग्रंथांत न घेता, सत्यमेव जयते या कार्यक्रमाची निर्मिती करणार्या आमीर खानकडून घेतात ! असे करणारे राज्यकर्ते हे सत्य आणि सर्वसामान्य हिंदु या दोहोंपासून दुरावले आहेत, अशी खंतही अधिवक्ता पुनाळेकर यांनी या वेळी व्यक्त केली. या प्रकरणाची तक्रार गृहमंत्री असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री, तसेच पंतप्रधान कार्यालय यांच्याकडे पाठवली आहे, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाने अर्थात मुख्यमंत्र्यांनी या अतिशय गंभीर अशा तक्रारीची त्वरित दखल घ्यावी, संबंधित पोलीस अधिकार्यांवर कारवाई करावी आणि नालासोपारा, कोल्हापूर, सातारा, पुणे, ठाणे, संभाजीनगर, गोवा अशा अनेक ठिकाणी संघटित होऊन मोर्चे काढणार्या हिंदूंना मा. मुख्यमंत्री आणि संबंधित पोलीस अधिकार्यांची कार्यालये यांवर मोेर्चा घेऊन जाण्याची पाळी येऊ देऊ नये,अशी कळकळीची विनंती हिंदु अधिवक्त्यांच्या वतीने या पत्रकार परिषदेत करण्यात आली. – संजीव पुनाळेकर]]>