चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती शनिवार दि. ४ एप्रिल २०१५ सायं. ६.३० वाजता || श्री शिवज्योत || अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपति श्री शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर अंधार होणे हे स्वतःला हिंदू म्हणवून घेणाऱ्या प्रत्येकाला लज्जास्पद आहे . शिवतीर्थ दादर येथील श्री शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ मुर्तीवर आणि त्याखालील असणाऱ्या राज्याभिषेकाच्या शिल्पावर सायंकाळ नंतर विद्युत प्रकाशाची अत्यंत गरज आहे . गेले २५ वर्ष गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरूजी यांच्या प्रेरणेने ‘रायगडव्रत’ म्हणजेच किल्ले रायगडावर शिवप्रभुंची नित्य पूजा केली जात आहे . त्याच प्रेरणेने गेले तीन वर्षे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान – मुंबई विभागातर्फे ‘शिवतीर्थव्रत’ आम्ही सुरु केले आहे . आम्ही शिवभक्त धारकरी दर रविवारी शिवस्मारका समोर ‘शिववंदना’ सुरु करीत आहोत . शिववंदना सुरु असताना एक गोष्ट आमच्या प्रकर्षाने नजरेस आली आहे की , शिवतिर्थावर जेथे नजर जाईल तेथे विद्युतप्रकाशाची सोय आहे . पण दुर्दैव असे की , गेले एक वर्ष स्मारकासमोरील विद्युतदिवे बंद पडले आहेत. आणि त्याची साधी दखल कोणी घेत नाही याची फार खंत वाटते. स्मारक उभी करायची आणि ती सवयीची झाली की त्याकडे नजर सुध्दा वळत नाही ही पद्धत बदलली गेली पाहिजे. आज अनेक शिवभक्त धारकरी मुंबईच्या अनेक विभागातुन शिववंदनेसाठी इथे येतात अश्यावेळी शिवरायांच्या स्मारकासमोर अंधार दिसणे योग्य नाही. तरी श्री शिवपुण्यतिथीच्या दिवसा पासून दर रविवारी स्मारकासमोर ‘श्री शिवज्योत’ प्रज्वलीत केली जाणार आहे. आमची स्थानिक मा. खासदार, मा. आमदार, मा. नगरसेवक या सर्वांना विनंती आहे की आपण यासाठी त्वरीत हालचाल करावी आणि स्मारकासमोर विद्युतप्रकाश सुरु करावा . धन्यवाद ! आपले श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान – मुंबई विभाग आणि समस्त शिवप्रेमी संघटना]]>