मुंबई: मुंबईत यापुढे एकही नवा सी लिंक होणार नाही, हे आता स्पष्ट झालंय. त्याऐवजी मुंबईच्या किनारपट्टीवरून जाणाऱ्या कोस्टल रोडसाठी राज्य सरकार अनुकूल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी DNAया वृत्तपत्राला ही माहिती दिलीये. सी लिंकचे अनेक तोटे आहेत. त्यामुळं प्रवास लांबतोच, शिवाय त्याचा खर्चही जास्त आहे. मात्र वाहनचालकांसाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा कोस्टल रोड फ्री वे असेल. सी लिंकसाठी मुंबईकरांना भरमसाठ टोल मोजावा लागला असता. कोस्टल रोडला मात्र असा कुठलाही टोल नसेल. वांद्रे वरळी सी लिंकच्या दोन्ही बाजूला हा रस्ता असेल. उत्तरेकडे सध्या कांदिवलीपर्यंत हा रस्ता प्रस्तावित असला, तरी तो वसई-विरारपर्यंत नेता येईल. दक्षिणेकडे सीएसटीजवळ हा रस्ता समाप्त होईल. हा फ्री वे कसा असेल-कांदिवली गोरेगाव, वर्सोवा, विलेपार्ले, खारदांडा, वांद्रे-वरळी सीलिंक, वरळीहून हाजी अली, प्रियदर्शिनी पार्क आणि नरिमन पॉइंट असा हा कोस्टल रोड असेल. यातला काही भाग उन्नत मार्ग असेल, तर या रस्त्यावर २ बोगदेही असतील. — अभिजीत दरेकर]]>