मुंबई 'दिमाखात' अंतिम फेरीत, गाठ पुन्हा एकदा पुण्याशी

कोलकाताला लागली गळती एलिमिनेटर सामन्यात पावसाने व्यत्यय आणला असतानाही जवळजवळ दीड वाजता संपलेल्या सामन्यात कोलकाताना विजय साजरा केला खरा, परंतु मुंबई इंडियन्स समोर त्यांच्या आघाडीच्या फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली आणि निम्मा संघ सात षटकांतच तंबूत परतला. मुंबई इंडियन्सने कर्ण शर्मावर हरभजनपेक्षा जास्त भरवसा ठेवला आणि त्याने विश्वास सार्थ ठरवत बुमराच्या साथीने कोलकाताच्या डावाला भिंगार पाडलं. बुमराने ख्रिस लिन (४) व रॉबिन उथप्पा (१) यांना परतावले तर कर्ण शर्माने सुनील नरेन (१०), गौतम गंभीर (१२) व ग्रँडहोमे (०) यांना तंबूचा रस्ता दाखवला. एरवी पावरप्लेमध्ये दमदार सुरुवात करणारा कोलकाता नाईट रायडर्स आज मात्र सपशेल आपटला. सूर्यकुमार यादव-ईशान जग्गी सातव्याच षटकात निम्मा संघ बाद झाला असताना कोणी तरी पुढे येऊन जबाबदारी घेऊन डावाला आकार देण्याची गरज असताना कोलकातासाठी धावून आले ते सूर्यकुमार यादव व ईशान जग्गी. ३१ धावांत पाच गडी बाद झाले असताना या दोन मधल्या फळीतील फलंदाजांनी काहीशी संयमी फलंदाजीचे नमुने दाखवत डावाला आकार दिला. ७०-८० धावांची नामुष्की ओढवलेल्या कोलकाता नाईट रायडर्ससाठी यांनी सहाव्या गड्यासाठी ४७ चेंडूंत ५६ धावांची भागीदारी रचून दिली. याच्याच जोरावर कोलकाताला १०० धावांचा आकडा पार करता आला. मुंबईच्या आघाडीच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करीत कोलकाताला १९ व्या षटकातच १०७ धावांवर बाद करत विजयाचा पाय रचला. कर्ण शर्माने चार षटकांत केवळ १६ धावा खर्च करत चार गडी टिपले तर जसप्रीत बुमराने तीन षटके गोलंदाजी करीत एक निर्धाव टाकत केवळ सात धावा देत तीन गडी टिपले. मुंबई गडबडली आक्रमक सुरुवातीस नेहमीच महत्व देणारी मुंबई इंडियन्स आजची तसाच पवित्रा घेतला खरा परंतु जिगरबाज खेळींसाठी प्रसिद्ध असलेल्या गौतम गंभीरने आपला फिरकीचा प्रमुख अस्त्र पियुष चवलाला दुसऱ्याच षटकात बोलावले आणि सिमन्सला (३) बाद करीत मुंबईला पहिला धक्का दिला. रिप्ले मध्ये चेंडूत लेग स्टम्पच्या बाहेर जात होताना दिसला आणि मुंबई व पंच यांचा अनोखा खेळ पुन्हा पाहावयास मिळाला. पुढच्या षटकात पार्थिव पटेलने उमेश यादवच्या गोलंदाजीवर दोन खणखणीत चौकार लगावत डाव सामना लवकरच संपवण्याचे संकेत दिले. यादवला आणखी एक फटका मारण्याच्या नादात पटेल (१४) उथप्पाकडे झेल देत बाद झाला आणि मुंबईला तिसऱ्या षटकात दुसरा धक्का दिला. पावरप्लेच्या शेवटच्या षटकात चावलाचा चेंडू रायडूला चकमा देत ऑफ स्टम्पवर आदळला आणि सहाव्या षटकात मुंबईची अवस्था तीन बाद ३४ अशी झाली. रायडू ११ चेंडूंत केवळ सहा धावा करू शकला रोहित-कृणालची धाव तीन गडी सहा षटकांतच बाद झाल्यानंतर मुंबई गडबडले की काय असे वाटत असताना कर्णधार रोहित शर्मा, ज्याच्या बॅट मधून यंदा पुरेशा धावा निघाल्या नसताना कृणाल पांड्याच्या साथीने मुंबईची बोट पार करून दिली. ४० चेंडूंत महत्वपूर्ण ५४ धावांची भागीदारी रचत मुंबईच्या विजयाचा पाय राचला. वेगवान गोलंदाजांना सावधपणे खेळून काढत स्पिनर्सना चांगलेच चोपून काढले. वेगवान गोलंदाजांना एकही चौकार-षटकार न ठोकणाऱ्या रोहित-कृणालने स्पिनर्सना तब्बल सात चौकार व एक षटकार लगावला. १३ व्या षटकात रोहित (२६) पूल शॉट मारण्याच्या नादात दीप स्क्वेयर लेगला झेल देत बाद झाला. तर कृणाल पांड्या ३० चेंडूंत आठ चौकार ठोकत ४५ धावा करून नाबाद झाला. मुंबईने १०८ धावांचे आव्हान पंधराव्या षटकात चार गडी गमावत पार केले. याच विजयाबरोबर चौथ्यांदा आय. पी. एल. फायनलमध्ये मुंबई इंडियन्सने धडक मारली आहे. येत्या रविवारी पुणे विरुद्ध अंतिम सामना असले.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *