एमसीए तर्फे भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याच्या प्रत्येक दिवसाची तिकिटे आजपासून विक्रीस उपलब्ध

पुणे, दि.9 फेब्रुवारीः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, गहुंजे येथे होणार्‍या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी क्रिकेट सामन्याची प्रत्येक दिवसाची तिकीटे आजपासून (शुक्रवार, 10 फेब्रुवारी) विक्रीस उपलब्ध होणार आहेत. पुण्यामध्ये दि. 23 ते 27 फेब्रुवारी 2017 दरम्यान आयोजित होणारा हा पहिला-वहीला आंतराराष्ट्रीय कसोटी सामना असून या ऐतिहासिक सामन्याचे साक्षीदार होण्याचे आवाहन एमसीए तर्फे करण्यात आले आहे. एमसीए तर्फे 22 फेब्रुवारीपासून प्रत्येक दिसाचे तिकीट उपलब्ध होईल, असे याआधी जाहीर करण्यात आले होते. क्रिडाप्रेमींनी वारंवार केलेल्या विनंती मुळे तसेच आठवडयाच्या ‘विकेन्ड’च्या सुट्ट्यांचे महत्व लक्षात घेता एमसीएने प्रत्येक दिवसाची तिकीटे विक्रीस उपलब्ध केली आहेत. 1 फेब्रुवारीपासून कसोटी सामन्याची तिकीट विक्री सुरू झाली होती. पण केवळ ‘सिझन तिकीट’च विक्रीस उपलब्ध होते. आता क्रिकेटप्रेमी प्रत्येक दिवसाचेही तिकीट विकत घेऊ शकणार आहेत. पीवायसी हिंदू जिमखाना आणि एमसीए स्टेडियम, गहुंजे येथील बॉक्स ऑफीस येथे प्रत्यक्ष तिकीट विक्री तसेच लेेज्ञूीहेु.लेा या संकेत स्थळावर ऑनलाईन विक्रीही सुरू आहे. प्रत्येक दिवसाच्या तिकीट विक्रीचे दर असेः साऊथ पॅव्हेलियन ए आणि बी स्टँड रू.2000ˆ/-; साऊथ अप्परः रू. 600/-; साऊथ लोअरः रू. 1000/-; नॉर्थ स्टँडः रू.1000/-; नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट स्टँडः रू.800/-; साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट स्टँडः रू.800/-; ईस्ट स्टँड आणि वेस्ट स्टँडः रू.400/-. याबाबत अधिक माहितीसाठी मोबाईल क्र. 08237218100 किंवा 08381048293 येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *