मावळ्यांनो, कसा येऊ मी परत

कुणी मला म्हणतो, “शिवराय” तर, कुणी म्हणतो, “शिवबा” कुणी म्हणतो, “छत्रपती” तर कुणी म्हणतो, “मराठा” पण, सर्वांची एकच हाक असते… राजे…..परत या ! राजे…..परत या ! ****************************** कुणी म्हणतो, “मी मावळा शिवबाचा” तर कुणी म्हणतो, “मी शिवभक्त” पण, सर्वांची एकच हाक असते… राजे…..परत या ! राजे…..परत या ! ****************************** कुणी म्हणतो, “जय भवानी, जय शिवाजी” तर कुणी म्हणतो, “जय जिजाऊ, जय शिवराय” पण सर्वांची एकच हाक असते… राजे…..परत या ! राजे…..परत या ! ****************************** कुणी म्हणतो, “हिन्दवी स्वराज्य रक्षक” तर कुणी म्हणतो, “स्त्री सम्मानरक्षक” पण सर्वांची एकच हाक असते… राजे…..परत या ! राजे…..परत या ! ****************************** अरे, कशाला येऊ मी परत, तुमचा “नामर्दपणा” पाहायला ? ****************************** अरे, माझ्या राज्यात… स्त्री जातीचा सम्मान राखला जायचा, येथे तर रोजच “खैरलांजी” घडतात. अरे, माझ्या राज्यात… पराक्रमाला “बक्षिस” मिळत, येथे तर रोजच “पानसरे, दाभोळकर मरतात ! ****************************** अरे, चालविण्याशी राज्य कारभार सुरतेवर मारिले छापे अनेक, निर्माण करण्या शत्रुवर वचक जिंकीले गड-किल्ले अनेक ! ****************************** अरे, रक्षण करण्या स्वराज्याचे उभारिले आरमार सागरी, अरे, कसे नाही कळले तुम्हासी कसाब बैसिला ना, उरावरी ! ****************************** पाहिला नाही, धर्म, जात-पात, दुश्मनांचा केला ” अधःपात”. अरे, घालता तुम्ही मात्र आज, तिथी अन् तारखेचा वाद ! ****************************** अरे, परत नका म्हणू तुम्ही मला…. राजे…..परत या ! राजे…..परत या ! अरे, कशाला येऊ मी परत, तुमचा “नामर्दपणा” पाहायला ? ****************************** अरे, असाल जर माझे खरे मावळे, अरे, असाल जर खरे शिवभक्त, तर… “आदर्श, सिंचन, कँपाकोला सारखे घोटाळ्यांना आवर घाला, षंढासारखे स्वस्थ बसू नका….. ****************************** अरे, स्वतःला माझे मावळे म्हणविता ना ! मग, तानाजी व्हा, संताजी-धनाजी व्हा ! बाजीप्रभू, जिवा महाला व्हा ! माझी मराठी भूमी संकटात आहे, हिन्दवी स्वराज्य संकटात आहे, आया-भगिणींची अब्रू वाचवा ! महाराष्ट्राचे नाव सातासमुद्रपार गर्जू द्या ! ****************************** अरे, पावणे चारशे वर्षे झाली जाऊनी मज, आता तरी स्वराज्याची जबाबदारी घ्या, अन्, माझा स्वाभिमानी मावळा व्हा ! अन्, पुन्हा नका म्हणू,,,,,,, राजे…..परत या ! राजे…..परत या ! ****************************** अरे, मी तर आहेच ना, तुमच्याच ” नसानसांत” ! विश्वास नाही का !!!! मग, बोला कि…… हर….हर….हर महादेव… हिन्दवी स्वराज्याचा विजय असो… माझ्या मातृभूमीचा विजय असो… ******************************

लेखक, संपादक. “युवा सह्याद्री” अरुण आत्माराम माळी हिन्दु महासभा कोंकण युवा प्रभारी संपर्क:- ९८२१००४९६९ ९२२०४७४७८९

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *