"मराठी टायगर्स" चित्रपटावर मग्रुर कर्नाटक सरकारची बंदी, मराठीद्वेष उफाळून आला

बेळगाव : येळ्ळूरमध्ये २५ जुलै २०१४ रोजी मराठी भाषिकांवर कानडी पोलिसांनी केलेल्या अत्याचारावर आधारित ‘मराठी टायगर्स’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यावर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. अमोल कोल्हेंची प्रमुख भूमिका असलेला ‘मराठी टायगर्स’ हा चित्रपट फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रासह बेळगावातही प्रदर्शित होत आहे. हे कमी म्हणून की काय आज पोलिस उपायुक्त अनुपम अगरवाल यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची बैठक घेऊन शहरातील शांततेला बाधा येईल असे कोणतेही कृत्य केले जाऊ नये, अशी ताकीदच दिली आहे. सोशल मीडियावर चित्रपटाविषयी चर्चा सुरु आहे. सीमाप्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी कोणतंही मत प्रदर्शन करु नये, तसंच चित्रपट प्रदर्शित झाला म्हणून आनंदोत्सव करुन दुसऱ्या बाजूच्या भावना दुखवू नये, असं आवाहनही अनुपम अगरवाल यांनी केलं आहे. मराठी भाषिक गेल्या पाच दशकाहून अधिक काळ आपल्या न्याय मागणीसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत आहेत. मराठी भाषिक दरवर्षी कन्नड राज्योत्सव दिनी ‘काळा दिन’ पाळत आले आहेत. बेळगावात अधिवेशन घेतले जाते त्यावेळी त्याला प्रत्युत्तर म्हणून सीमामेळावा आयोजित केला जातो. ‘मराठा टायगर्स’ चित्रपट अद्याप प्रदर्शित झाला नाही. त्या चित्रपटात काय आहे याची माहितीही नाही. पण असं असतानाही जिल्हा प्रशासन आणि कन्नड नेते निष्कारण चित्रपटाचा मुद्दा वादाचा बनवत आहेत, अशी प्रतिक्रिया माजी महापौर आणि सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी व्यक्त केली. बैठकीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे दीपक दळवी, प्रकाश मरगाळे, रणजीत चव्हाण पाटील, मोतेश बार्देष्कर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *