लष्करी इतमामात शहीद मेजर प्रसाद महाडिक यांच्यावर अंत्यसंकार

विरार: रत्नागीरी येथील गुहागरमधील कुटगिरीसारख्या दुर्गम भागातून सैन्यदलात भरती झालेल्या मेजर प्रसाद महाडिक यांच्यावर येथील राहत्या घरी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. चीनच्या बॉर्डरवर सेवेत असताना तवंग-अरूणाचल सीमेवर दारूगोळ्याचं चेकिंग करत असताना टँकला लागलेल्या आगीमुळे स्फोट झाला आणि त्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मूळचे  गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावचे रहिवासी असलेल्या मेजर महाडिक यांच्या जाण्याची बातमी कळताच या गावावर सध्या शोककळा पसरली. विरार पाश्चीम सेन्ट्रल पार्क यशवंत दीप या सोसायटी त्याच्या राहत्या घरात पार्थिव आणण्यात आले.विरार पश्चिम विराट नगर येथील स्मशान भूमीत त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्य संस्कार करण्यात आले. प्रसाद महाडिक यांचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावी जिल्हापरिषदेच्या शाळेत झालं. झालं.  तर त्यानंतर ते वडिलांच्या नोकरी निमित्त मुंबईला गेले. दरम्यान, कुटगिरी गावात त्यांचं घरही आहे. महाडिक यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि धाकटी बहीण असा परिवार आहे.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *