आज शुक्रवार, दि.१९ एप्रिल २०१९ यां दिवशी, नगरसेवक मा.संतोषभाऊ निमघरे यांचा मुलगा कृष्णा ह्याच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण मित्र संघटना,भारत संस्थेचे पदाधिकारी व वृक्ष मित्र परिवार तथा वरुड शहरातील मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यातच आले.
वृक्ष मित्र परिवार गेल्या २ महिण्यापासून मान्यवरांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षण करण्यासाठी झटत आहे, जवळपास ५० चे वर नवीन वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन सुद्धा करीत आहे,त्याचाच भाग म्हणून आज संतोष निमघरे यांचे घराचे आवारात त्याचा मुलगा कृष्णा याच्या वाढदिवसानिमित्त १५ वृक्षांची लागवड करून त्याच्या संगोपनांची जबाबदारी निमघरे कुटुंबातील सदस्य यांचेंकडे सोपविण्यात आली.
”वाढदिवसानिमित्त पैसा खर्च न करता एक वृक्ष लावावे व वृक्ष मित्र परिवार संकल्प घेऊन मि माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त १५ झाडे लावले व मि झाडेची स्वतः जोपासना करेल”, असे संतोष भाऊ निमघरे यांनी आपले विचार मांडले.
वृक्षारोपण कार्यक्रमास नगराध्यक्ष स्वाती ताई आंडे, नगरसेवक नरेंद्र भाऊ बेलसरे, राजु भाऊ सुपले माजी नगराध्यक्ष रविभाऊ थोरात, किशोर भाऊ माहोरे , युवराज भाऊ आंडे, मुलीधर पवार, नरेंद्र भाऊ फसाटे, किशोर भाऊ तडस,किसनाजी धाडसे पर्यावरण मित्र संघटना संस्थेचे मार्गदर्शक अजय देशपांडे , अमरावती जिल्हा अध्यक्ष राजु सिरस्कार , शहर अध्यक्ष रमेश गवई, प्रचारक प्रभाकराव घाटोळे, महिला अध्यक्ष प्रज्ञा ताई बोडखे, प्रीतिताई निमघरे, डाॅ.स्वाती चोरे, सौ .वैशाली देशमुख, कु. छाया बाहेकर, सौ.सोनु ताई तडस इतर मान्यवर उपस्थित होते.
]]>