औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ हे नामकरण स्वतंत्र भारताच्या अस्मितारक्षणासाठी आवश्यक ! इतिहासात क्रूरतेसाठी ओळखल्या जाणार्या औरंगजेबाचा महाराष्ट्रातील साहित्यिक श्री. सदानंद मोरे आणि भालचंद्र नेमाडे यांना मोठा पुळका आला असून, राज्यातील ‘औरंगाबाद’ जिल्ह्याचे नाव ‘संभाजीनगर’ करण्यास त्यांनी विरोध दर्शवला आहे. श्री. मोरे यांनी औरंगजेबाचा भाऊ दारा शुकोह याला धर्मनिरपेक्षतेचे प्रमाणपत्र बहाल करून त्याचे त्याचे नाव औरंगाबादला देण्याची सूचना केली आहे, तर नेमाडे यांनी अगोदर तेथे पाणी पुरवठा करण्यास सांगितले आहे. वास्तविक छत्रपती शिवरायांच्या नंतर मराठा साम्राज्यासाठी बलिदान करणार्या छत्रपती संभाजीराजे यांचे नाव जिल्ह्याला देणे हा एक सन्मानच आहे. त्यांच्या सर्वोच्च बलिदानामुळेच ते ‘नेमाडे’ आणि ‘मोरे’ टिकले; अन्यथा तेही कुठले तरी ‘उद्दीन’ वा ‘खान’ होऊन नमाजी बनले असते. परकीय आक्रमक मुसलमान राजांनी बळाने धाराशिवचे उस्मानाबाद, नाशिकचे गुलशनाबाद, प्रयागचे अलाहाबाद, भाग्यनगरचे हैदराबाद अशी हिंदूस्थानातील शहरांची नामकरणे करून आक्रमणांचा ठसा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. हा ठसा पुसण्याचा प्रयत्न भारताच्या स्वातंत्र्यानंतर काही प्रमाणात झाला, तरी राजकारण्यांच्या मतांच्या पेढीमुळे तो पूर्णपणे अंमलात आणला गेला नाही. सध्याच्या सरकारच्या कृतीचे समर्थन करण्याऐवजी हे साहित्यिक मोगली सल्तनतीचे भाट बनून त्याला विरोध करून महाराष्ट्राच्या इतिहासाशी प्रतारणा करत आहेत. याबद्दल त्यांचा निषेध व्हायलाच हवा ! तसेच वारंवार तोडफोडीचा इशारा देणार्या अन् छत्रपती संभाजी महाराजांच्या नावे चालणार्या संघटना आता मूग गिळून गप्प का आहेत, हेही त्यांनी सांगायला हवे. आक्रमकांच्या गुलामगिरीत धन्यता मानणार्या सदानंद मोरे यांनी आता उर्दू साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारायला हरकत नाही ! अजमेरला जन्मलेल्या मोगलाचे नाव महाराष्ट्रातील जिल्ह्याला देऊन त्यांना काय साध्य करायचे आहे ? एक वेळ या नामांतराला कट्टरपंथी औवेसीचा विरोध समजू शकतो; मात्र श्री. मोरे त्याच्या सुरात सुर मिसळत आहेत, हे दुर्दैवी आहे. तसेच आज मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न सांगणार्या श्री. नेमाडे यांना ज्ञानपीठ स्वीकारण्यापूर्वी महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या आत्महत्या दिसल्या नव्हत्या का ? तेव्हा त्यांनी पुरस्कार न स्वीकारता सरकारला याविषयी का बजावले नाही ? विश्वात इस्लामी राज्य आणून भारताचे भविष्यात ‘खोरासान प्रांत’ अशा नामकरणासह नकाशा प्रसिद्ध करणार्या इस्लामिक स्टेट (आय.एस्.आय.एस्.) ला त्यांनी असे सल्ले देण्यास कोणाचीही हरकत नाही ! औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामकरण हा अस्मिता रक्षणाचा भाग म्हणून आवश्यक आहे. याला विरोध करणार्यांनी महाराष्ट्राच्या मातीशी प्रतारणा करू नये. आपला विश्वासू, श्री. सुनील घनवट, राज्य संघटक, हिंदू जनजागृती समिती (संपर्क क्रमांक : ९४०४९५६५३४)]]>