तुंगार दुर्ग अभ्यास सफर आणि प्राचीन कुंड संवर्धन मोहीम

रविवार,दिनांक ५ मे २०१९ रोजी तुंगार दुर्ग अभ्यास सफर आणि प्राचीन कुंड संवर्धन मोहीम आयोजित करण्यात आली असून दुर्ग प्रेमींसाठी संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. मोहिमेची आखणी खालील प्रमाणे आहे.
भेटण्याचे ठिकाण :वसई विरार महानगरपालिका कार्यालय, विरार (पूर्व), विरार रेल्वे स्थानकाजवळ. एकूण रूपरेषा:-
शनिवार दिनांक ४ मे २०१९ रोजी सांयकाळी ६ पर्यंत सांगितलेल्या जागी जमावे तिथून पुढील प्रवास सुरु होईल.
रात्री तुंगार दुर्गावरील आश्रमात राहण्याची सोय करण्यात येईल, परंतु त्यासाठी पूर्वकल्पना देणे आवश्यक असल्यामुळे नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
रविवारी येणाऱ्यांनी सकाळी ७.३० पर्यंत किल्ल्यावर पोहोचावे.वज्रेश्वरी रोड मार्गे गडावर जाण्यासाठी वाट आहे. वैयक्तिक वाहनाद्वारे गडाच्या माथ्यावर पोहोचता येते.
विशेष टीप:-वसई पूर्वेला असणारे तुंगारेश्वर मंदिर आणि तुंगार दुर्ग यात खूप अंतर असल्याने वज्रेश्वरी मार्गे गडावर पोहोचने सोयीस्कर ठरेल
सोबत काय आणाल :- १) पाण्याची बाटली अत्यावश्यक (२ ते ३ लिटर) २)सुका खाऊ३)जमल्यास संवर्धनासाठी साहित्य
नावनोंदणीसाठी संपर्क :-आकाश जाधव – ७६६६४७२८२०प्रीतम पाटील   – ९०४९५२५६०१मानसी शिरगावकर – ८०८२८०८८७६
सौजन्य: किल्ले वसई मोहीम परिवार

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *