स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मदिनी म्हणजेच मंगळवार दि २८ मे २०१९ रोजी सकाळी ११ वाजता हि अभ्यासमोहिम भगूर ता.जि.नाशिक येथे होणार आहे.
तसेच या वर्षी विशेष म्हणजे प्रथमच दोन अतिशय महत्त्वपूर्ण व्याख्याने भगूर मोहिमे मध्ये होणार आहेत. पार्थजी बावस्करांचे ‘स्वा.सावरकर युवकांचे तेजस्वी स्फूर्तिस्थान’ आणि प्रसादजी मोरे यांचे ‘गांधीहत्या आणि निष्कलंक सावरकर’ या विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण आणि महत्त्वाची व्याख्याने या निमित्ताने सावरकरांच्या जन्मभूमीत ऐकण्याची संधी मिळणार आहे.
यावेळी महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून राष्ट्रप्रेमी व सावरकर प्रेमी सहभागी होणार आहेत. आपणही सर्व या मोहिमेत सहभागी होऊन सावरकरांचे बालपण ज्या भगूर शहरात गेले तेथील ऐतिहासिक वाडा, शाळा, अभ्यासिका, दारणा नदी तिर, राम मंदिर, खंडेराव मंदिर या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तेथील झालेल्या सावरकरां विषयीच्या घटनांचा इतिहास जाणावा. मुंबई व मंबईच्या आसपासच्या शहरांतून एकत्रित भगूर येथे येण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
तेव्हा या मोहिमेत सहभागी होण्यासाठी
9029147720 (सात्विक पेणकर)
99301 78979 (आदित्य नाखवा) या क्रमांकांवर संपर्क करा.