गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरूजी ‘संभाजीराव भिडे गुरूजी’ एक प्रभावी विलक्षण व्यक्तीमत्व ! खर यावरुन गुरूजी पूर्वी फिजिक्सचे प्राध्यापक वगैरे असतील यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही. अत्यंत तल्लख स्मरणशक्ती, स्तिमित करणारी बुध्दीमत्ता, एखाद्या दगडाच्या अंगावरही रोमांच उभे करायला लावणारे वक्तृव आणि बारा महीने-चोवीस तास-तिन्ही त्रिकाळ सतत भ्रमण करणारे पाय . ही व्यक्तीच अशी की ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आली त्या प्रत्येकाचे हे गुरूच झाले . आज ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या माध्यमातून शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यासाठी गुरुजींनी लाखोंच्या संख्येने धारकरी उभे केले आहेत. || श्रीरायगड व्रत || १९९२ पासून शिवतीर्थ रायगडावरील शिवछत्रपतींच्या मुर्तीची दररोज पूजा चालु आहे. आजतागायत दररोज स्वखर्चाने शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते रायगडावर छत्रपतींची पुजा करत आहेत. || श्री दुर्गामाता दौड || नवरात्रौत्सवात किल्ले शिवनेरीवर शिवराय पोटात असताना श्री आई भवानी मातेकडे हिंदवी स्वराज्याच्या वाढीसाठी राजमाता जिजाऊसाहेबांनी जे मागणं मागितले असेल तेच मागणं मागायला पहाटे हाती भगवा ध्वज घेउन ही दौड़ नऊ दिवस शहरात, गावागावत काढली जाते. || श्री धारातीर्थ गडकोट मोहिम || श्री शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व अनेक मावळ्यांच्या बलिदानाने धारतीर्थे बनलेल्या, गडकोटांच्या मोहिमा दरवर्षी आयोजित करण्यात येतात. मृतवत् अंतःकरणाची हिंदुसमाजातील तरुणपिढी, ध्येयवादी, प्रखर देशधर्म भक्त बनविण्याचा मोहिम हा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. || धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज बलिदान मास || हिन्दवी स्वराज्याचे दुसरे छत्रपति संभाजी महाराजानी देव देश आणी धर्म व भारतमातेच्या कपाळावरिल सत्व स्वाभिमान आणि हिंदुत्वाचे कुंकू टीकावे म्हणून एक नाही दोन नाही तब्बल ४० दिवस आनन्वित अत्याचार सहन केले . मोगलांनी शंभूराजांचे दररोज एक एक अवयव तोडून , रोज अंगाची साल काढत होते. शेवटी पायापासून डोक्यापर्यंत देहाचे तुकडे तुकडे केले म्हणजेच , संभाजी महाराज मृत्युच्या दिशेने बलिदानाच्या मार्गावर संपूर्ण महिनाभर धीरोदात्त पणे चालत होते. हा कालावधी म्हणजे फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या आणि म्हणूनच हा महिना [ कालावधि ] सर्व हिंदुनी सूतक म्हणूनच पाळला पाहिजे ! धर्मवीर बलिदान मास फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या असा पाळायचा असतो. प्रत्येकाने या महिनाभरात – संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करावे व दररोज प्रतिमेपुढे प्रेरणा मंत्र ध्येय मंत्र व संभाजी सूर्यहृदय मधील श्लोक म्हणावे. एखाद्या गोष्टीचा त्याग करावा ( गोड, चहा, मांसाहार, चप्पल इ. ) ‘श्री शिवाजी आणि श्री संभाजी’ ही दोन महामंत्र या देशाने हिंदुराष्ट्र होण्यासाठी जपायला हवीत. महामंत्र आहे नव्हे शब्द साधा | जयाच्या स्मृतीनें जळे म्लेंच्छबाधा || नुरे देश अवघा जयाचे अभावी | ‘शिवाजी’ जपुं राष्ट्रमंत्र प्रभावी ||
— बळवंतराव दळवी 9892539660 श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान- मुंबई विभाग
]]>