सज्जनस्य हृदयं नवनीतं यद्वदन्ति कवयस्तदलीकम् । अन्यदेहविलसत्परितापात् सज्जनो द्रवति, नो नवनीतम् ॥ अर्थ…
‘सज्जनाचं हृदय म्हणजे नुसतं लोणी ‘ असं जे कवी म्हणताते ते खोटं (अलीकं) आहे. दुसर्याच्या ठिकाणी असलेल्या तापामुळे सज्जन द्रवतात लोणी नाही.मराठी रूपांतर सज्जनहृदय हे लोण्याचे कवींचे बोल असत्याचे परदुःखतापे द्रवती सज्जन वितळणे न कधी लोण्याचे चारुचंद्र उपासनी (संकलन:- हर्षल मिलिंद देव, नालासोपारा, पालघर)]]>