जगाच्या पोशिंद्याचं दुःख आभाळाला खेटलं शेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं उद्योगपतीच्या समोर तुम्ही नाचवता बायका शेतकऱ्याला द्यायला नाही म्हणता पैका शेतकरी झालं उध्वस्त ते आयुष्यातून उठलं शेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं उद्योगपतींना खुशाल देता मोठमोठ्या संधी कांद्याचे जरा भाव वाढले की निर्यातीवर बंदी असं दुटप्पी वागणं कसं तुम्हालाच पटलं शेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं मेक इन इंडियाचा केवढा मोठा बोलबाला तिकडे शेतकरी मात्र नुसते कष्ट करून मेला उद्योगपतीची वाढते ढेरी अन् शेतकऱ्याचं रक्त आटलं शेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं नफेखोर उद्योगपतीसाठी केवढा तुमचा आटापिटा जगाला जगविणारा मात्र मुद्दलामध्ये सोसतो तोटा किती मांडू हिशेब सारा मन पार विटलं शेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं कवी:-……… (संकलक:- श्री. संदिप बाजड, अमरावती)]]>